जालना जुना जालना भागात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे तिघेजण स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केले आहेत.
जुना जालन्यातील कचेरी रोड रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम आहे. या मशीनचे वायर तोडून मशीन मधील सुमारे 15 लाख रुपये रक्कम पळविण्याची तीन आरोपी तयारी करीत होते . एटीएम मध्ये छेडछाड होत असल्याचा संदेश संदेश वरिष्ठ कार्यालयाला गेला आणि वरिष्ठ कार्यालयातून जालना पोलिसांना हा संदेश मिळाला. पोलीस घटनास्थळावर येईपर्यंत आरोपी पसार झाले होते. एकाच महिन्यात तीन घटना घडल्यामुळे पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे गतीने फिरवत मिळालेल्या माहितीच्या आधारे जालना शहरातील तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. आदित्य आनंद नवगिरे वय 21 वर्ष राहणार सुवर्णकार नगर जालना, धनंजय अशोक उदावंत वय वीस वर्ष राहणार गणपती मंदिराच्या पाठीमागे सुवर्णकार नगर जालना ,राहुल राजकुमार मुख्यदल वय 23 वर्ष राहणार गणपती मंदिर जवळ सुवर्णकार नगर जालना. या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी एटीएम फोडल्याची कबुली दिली आहे. या गुन्हा मध्ये वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर पोलिसांनी जप्त केली आहे. या तिघांनाही ताब्यात घेतले आहे स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास लावला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर ,सचिन चौधरी आदींची आदींचा सहभाग होता.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com