छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी विजय पाटील यांना  शेंद्रा एमआयडीसीमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी पिंक पथकाला माहिती दिली आणि या पथकासह शेंद्रा एमआयडीसी येथील हॉटेल विजयराज बिअरबार वर छापा मारला असता नागपूर येथील निशा अरुण पाटील या  आंटीला स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना सोबत घेऊन वेश्या व्यवसाय करत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यासोबत इतर चार महिलाही तिथे हा व्यवसाय करताना दिसून आल्या बुधवारी रात्री हा छापा मारण्यात आला.

छत्रपती संभाजी नगर उपविभागाच्या पिंक पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बनसोड त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी रात्री बनावट ग्राहक पाठवले आणि त्यांच्या सहकार्यासह या हॉटेलच्या परिसरामध्ये सापळाही रचला ठरलेल्या साखळ्याप्रमाणे बनावट ग्राहकाला सर्व काही समजावून सांगितले होते आणि पाच पाचशे रुपयांच्या प्रत्येकी तीन नोटा या ग्राहका जवळ देऊन त्याला सदरील हॉटेलमध्ये पाठवले होते. ग्राहक गेल्यानंतर समोरच्या टेबलवर निशा अरुण पाटील वय 36 वर्ष राहणार वार्ड नंबर दोन धानला तालुका मैदा जिल्हा नागपूर हल्ली मुक्काम देवगिरी व्हॅली मिटमिटा पडेगाव ही बसलेली दिसली तिच्याशी सर्व व्यवहार बोलल्यानंतर तिने पुढील व्यवहारासाठी संमती दिली ही संमती मिळताच बनावट ग्राहकाने बाहेर उभे असलेल्या पोलिसांना इशारा केला त्यावेळी टाकलेल्या छाप्यामध्ये निशा अरुण पाटील हिच्याकडे बनावट ग्राहकाने दिलेल्या नोटा सापडल्या .तसेच इतर खोल्यांमध्ये देखील आणखी तीन महिला व्यवसाय करत असल्याच्या दिसून आल्या त्यामध्ये ,… 28 वर्ष राहणार हाजीमलला रोड कल्याण ….. वय 28 वर्ष राहणार गल्ली नंबर एक इंदिरानगर गारखेडा परिसर. … 28 वर्ष राहणार कबीर नगर गल्ली नंबर 3 उस्मानपुरा आणि एक आंटी अशा एकूण चार  महिला पोलिसांच्या हाती लागल्या आहेत या सर्व महिलांकडून वेगवेगळे रक्कम जप्त केली आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version