जालना -क्रिप्टो करेन्सी (GDC)जीडीसी, गोल्ड डिजिटल कॅश कॉइन, आभासी चलन ,अशा वेगवेगळ्या नावाने सर्व परिचित असलेल्या एका कोट्यावधी रुपयांचा घोटाळा ईडीटीव्ही जालना (www.edtvjalna.com)न्यूज ने दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी उघडकीस आणला होता .त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यात देखील याची पाळीमुळे असल्याचे समोर आले होते. आता या प्रकरणातील गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे आणि फसवणूक केलेल्या नऊ आरोपींची जप्त केलेली मालमत्ता हराशी करून गुंतवणूकदारांचे देणे फेडण्यात येणार आहे. या गुंतवणूकदारांमध्ये विशेष करून डॉक्टर मंडळी आघाडीवर आहे. घोटाळ्यापूर्वी नुकताच कोविड येऊन गेला होता आणि या कोविडमध्ये आलेला पैसा अनेक डॉक्टर मंडळींनी या गुंतवणुकीमध्ये गुंतवला होता आणि पुन्हा चौपट पैसे कमविण्याच्या नादाला लागले होते .परंतु झाले उलटेच जो होता पैसा तोही अडकून बसले. तक्रार करावी तर गुंतवणूक केलेला पैसा आला कुठून? अशी विचारना आयकर विभागाकडून होईल,” म्हणून भीक नको कुत्रा हटवा” अशा म्हणीप्रमाणे पैसे गेले तर हरकत नाहीत परंतु आयकर विभागाचा ससेमीरा पाठीमागे नको म्हणून अनेक डॉक्टरांनी या पैशावर पाणी सोडले.

जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये जालना शहरात राहणाऱ्या गोकुळ नगरी भागातील ऋषिकेश शेषराव काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पहिला गुन्हा नोंद झाला होता. याची व्याप्ती वाढल्यानंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या शाखेचा तपास पूर्ण झाला आहे आणि जप्त केलेल्या मालमत्तांची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सक्षम अधिकारी नियुक्त करण्यासाठी ज्या हद्दीमध्ये आरोपींची मालमत्ता आहेत त्या हद्दीतील जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. आजच्या पहिल्या भागात पाहुयात एकूण किती आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून जप्त केलेल्या वाहनांच्या स्वरूपातील मालमत्ता.

या प्रकरणात एकूण नऊ आरोपी आहेत .त्यामध्ये इरफान मोईद्दीन सय्यद राहणार गहूजे तालुका मावळ जिल्हा पुणे, अमोद वसंतराव मेहतर इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर, व्यंकटेश दशरथ भोई योगीपार्क पुणे, रमेश बाबुराव उत्तेकर औंधगाव पुणे, किरण भरतराव खरात सराफ नगर जुना जालना, दीप्ती किरण खरात राहणार सराफ नगर जुना जालना, शर्वरी अमोद मेहतर इचलकरंजी , मो.साबेर मो.याकूब घोची राहणार दुखी नगर जुना जालना, बिपिन पटेल सुरत गुजरात.

या प्रकरणात ज्या गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या होत्या त्या203 तक्रारींची एकूण रक्कम नऊ कोटी 33 लाख 76 हजार 400 रुपये एवढी होत आहे. आता पाहूयात जप्त केलेल्या वाहनांची संख्या. इरफान सय्यद च्या नावावर जागवार कार एक कोटी, महिंद्रा थार 20 लाख, स्कोडा 15 लाख, बीएमडब्ल्यू एक कोटी 80 लाख. व्यंकटेश भोई टोयोटो लेक्सल 67 लाख ,रमेश उत्तेकर बीएमडब्ल्यू पन्नास लाख, शर्वरी मेहतर वॉक्सवॅगन 25 लाख, किरण खरात बीएमडब्ल्यू चाळीस लाख ,फॉर्च्यूनर 35 लाख. मो.साबेर एक्स वन बीएमडब्ल्यू तीस लाख ,क्रियेटा दहा लाख. अशा एकूण पाच कोटी 65 लाख रुपयांच्या वाहनांची पोलिसांनी जप्ती केली आहे. त्याच सोबत सोन्या चांदीच्या अंगठ्या दागिने ब्रासलेट असा सुमारे नऊ लाख सात हजारांचा ऐवज, नगदी रोख एक लाख 51 हजार विविध कंपन्यांचे लॅपटॉप मोबाईल असे 17 लाख 60 हजार. एकूण 16 कोटी 11 लाख 86 हजार 392 रुपयांची मालमत्ता आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी गोठवलेली आहे. त्याशिवाय यांची जंगम मालमत्ता आणि बँक खात्यातील रक्कम देखील गोठवलेली आहे. पुढील भागात पाहूया कोणत्या आरोपीच्या नावावर बँकेमध्ये किती रक्कम गोठविले आहे.—-

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version