घनसावंगी- घनसावंगी तालुक्यात असलेल्या मंगरूळ खरात या गावचे टपाल जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आज दुपारच्या सुमारास अस्ताव्यस्त विखुरलेले दिसले. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
सुमारे 5000 लोकवस्ती असलेल्या या गावासाठी टपाल कार्यालय आहे आणि या गावापासून इतर अन्य दोन गावांचेही टपाल वितरण केले जाते. गावामध्ये असलेल्या जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर या गावातील तरुण अतुल रघुनाथ उनवणे यांना दुपारी चार वाजेच्या सुमारास हे टपाल अस्ताव्यस्तपणे विखुरलेले दिसले. त्यांनी त्यामध्ये शोध घेतला असता त्यांचे स्वतःचेच चेक बुक दिसून आले आहे. त्यांच्यासोबतच शोभा जगन राखंडे, लता आप्पासाहेब खरात ,विजय खरात, कल्पना शरद देशमुख, जयश्री खरात, सीमा खरात आदी गावकऱ्यांची काही महत्त्वाची कागदपत्रे एटीएम, चेक बुक, वित्तीय संस्थांचे पत्रव्यवहारही इथे दिसून आले आहेत.
दरम्यान यासंदर्भात या गावचे पोस्टमन रितेश साबळे यांना माहिती विचारली असता हे टपाल काल आपण गावातीलच एका जॉन नावाच्या व्यक्तीकडे दिले होते. आणि तो संबंधितांना नेऊन देतो असे म्हटल्यामुळे त्याच्याकडे दिले असल्याचे सांगितले. दरम्यान मंगरूळ खरात या गावासोबतच मुद्देगाव आणि भोगाव या अन्य दोन गावांचाही कारभार पहावा लागतो त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जा जाऊन टपाल देणे हे आपले काम नाही. असेही त्यांनी सांगितले. पोस्टाच्या बॅग आंतरवाली टेंभी पर्यंत येतात आणि तिथून पुढे आपण स्वतःच या टपालाची वाहतूक करीत असल्याचेही पोस्टमन रितेश साबळे यांनी सांगितले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172