Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    विशेष बातमी: वैद्यकीय महाविद्यालयाची वर्षपूर्ती; 65 MBBS डॉक्टरांची भरती; प्रत्येक सामान्य रुग्णालयाच्या प्रत्येक वार्डात मिळणार एमबीबीएस डॉक्टर 24 तास

    जिथे मिळवला रोजगार तिथेच केली चोरी; युवा प्रशिक्षणार्थ्याची आर.डी.सीच्या कार्यालयात चोरी; भाजपा आमदार आणि आरडीसीसी संबंधित पत्रव्यवहाराचे फोटो?

    बालिकेला शोधा एक लाख रुपये मिळवा! पोलिसांनी जाहीर केले बक्षीस

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » डॉ.रफिक झकेरीय महाविद्यालयात मायलेकरांचा जोड धंदा; पीएचडी साठी दरमहा दहा हजार रुपयांची मागतात लाच!
    Jalna District

    डॉ.रफिक झकेरीय महाविद्यालयात मायलेकरांचा जोड धंदा; पीएचडी साठी दरमहा दहा हजार रुपयांची मागतात लाच!

    EdTvBy EdTvAugust 20, 2024No Comments4 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    छत्रपती संभाजी नगर- आपल्या अंगी आहे ती गुणवत्ता वाढवून नवीन गुणवत्ता आणि अनुभव संपादन करून त्या जोरावर विद्यार्थ्यांना सज्ञान करण्यासाठी अनेक शिक्षक उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे येतात. त्यामध्ये पीएचडीही करतात .ही पीएचडी करताना योग्य मार्गदर्शकही मिळायला हवा, परंतु मार्गदर्शकात जर लाच मागत असेल तर त्याच्याकडून शिकायचे काय?. अशीच घटना सोमवार दिनांक 19 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या डॉ. रफिक झकिर या महाविद्यालयात उघडकीस आली आहे. या महाविद्यालयातील चौघा विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याचा गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये विशेष म्हणजे पीएचडीच्या मार्गदर्शक होत्या महिला मार्गदर्शक आणि त्यांच्या मुलाने संगणमत करून या पीएचडी उमेदवाराकडून दरमहा दहा हजार रुपयांची लाच अशी एकूण पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी पन्नास हजारांचा पहिला हप्ता घेताना या मायलेकरांना रंग यात पकडले.

    1) श्रीमती डा‌‌ॅ. एराज सिद्दीकी, संशोधक मार्गदर्शक (phd गाईड), ग्रंथपाल, डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, नवखंडा छत्रपती संभाजीनगर रा. पडेगाव छत्रपती संभाजीनगर ( वर्ग-1 )
    2) शेख उमर शेख गणी वय 52 वर्ष व्यवसाय नोकरी ग्रंथालय परिचारक डॉ रफिक झकेरिया महिला महाविद्यालय नवखंडा छत्रपती संभाजीनगर ( वर्ग- 4)3) डॉ. सिद्दीकी मो. फैसोद्दीन ऊर्फ समीर मो. रियाजुद्दिन वय 36 वर्ष, व्यवसाय- सहाय्यक संचालक, ERS रिसर्च अँड टेक्नोलॉजी pvt. LTD, मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर रा. पडेगाव छत्रपती संभाजीनगर (खाजगी इसम)
    4) सिद्दीकी फराज मो. रियाजुद्दिन वय 31 वर्ष, व्यवसाय- संचालक, ERS रिसर्च अँड टेक्नोलॉजी pvt. LTD, मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर रा. पडेगाव छत्रपती संभाजीनगर (खाजगी इसम)▶️ लाच मागणी रक्कम –
    नोव्हे 2022 ते नोव्हे 2026 पावेतो दरमहा 10,000/- रू प्रमाणे एकुण 5,00,000/- रु ची लाच मागणी करून त्यातील 50,000/- रुपये रक्कम स्विकारली.▶️ लाच पडताळणी दिनांक –
    24/07/2024, 25/07/2024, 27/07/2024,
    29/07/2024 ▶️ लाच स्वीकारली दिनांक –
    19/08/2024 ▶️ स्विकारली लाच रक्कम – 50,000/- रुपये ▶️ कारण- यातील फिर्यादी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयामध्ये विद्यावाचस्पती PHD चे संशोधन करीत आहे. त्यांना विद्यापीठाकडून संशोधनासाठी संशोधक मार्गदर्शक म्हणुन आलोसे क्र.1 श्रीमती डॉ.एराज सिद्दीकी मॅडम, ग्रंथपाल, डॉ रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, नवखंडा, छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रारदार यांना महाराष्ट्र शासनाचे म.ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर यांचेकडून अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) म्हणुन दरमहा 50,400 रूपये मिळत आहेत. सदर फेलोशिप तक्रारदार यांना मिळण्यासाठी तक्रारदार यांना tyanche प्रोग्रेस रिपोर्ट, स्वयं घोषणा पत्र, हजरी पत्रक, HRA प्रमाणपत्र, तिमाही सहामाही प्रोग्रेस रिपोर्ट यावर आलोसे क्रं 1 यांची सही घेऊन सदर कागदपत्रे विद्यापीठात सादर करावे लागतात. सदर कागदपत्रा वर सह्या करण्यासाठी तसेच तक्रारदार यांचे रीपोर्ट पॉझिटिव्ह देण्यासाठी आलोसे क्र.1 डॉ. सिद्दीकी या तक्रारदार यांचेकडे दरमहा 10, 000 रुपये प्रमाणे लाचेची मागणी करीत आहे, अशी तक्रारदार यांनी तक्रार दिली आहे.
    सदर तक्रारीच्या अनुशंगाने दि.24.07.2024 रोजी तक्रारदार यांना  शेख उमर शेख गणी यांनी तक्रारदार यांचे कागदपत्रावर श्रीमती डॉ. एजाज सिद्दिकी यांची सही घेऊन देण्यासाठी 25,000/- रुपयाची लाचमागणी केली. त्यानंतर दि. 27.07.2024 रोजी श्रीमती सिद्दिकी यांनी तक्रारदार यांना त्यांचा मुलगा डॉक्टर सिद्दिकी मोहम्मद फसुद्दीन यास भेटण्यासाठी सांगितले. त्यानंतर दि. 29.07.2024 रोजी आरोपी डॉक्टर सिद्दिकी यांनी त्यांची आई श्रीमती डॉक्टर एजाज सिद्दिकी यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यास तुमचे सगळे रिपोर्टवर आलोसे क्र 1 यांचे सह्या करुन देण्यासाठी, तसेच RAC रिपोर्ट पाॅझीटीव्ह देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे त्यांना मिळणारे फेलोशीप मधुन नोव्हे 2022 ते नोव्हे 2026 पावेतो दरमहा 10,000/- रू प्रमाणे एकुण 5,00,000/- रु ची लाच मागणी करून त्यातील 50,000/- रुपये स्विकारन्याचे मान्य केले. त्यावेळी तक्रारदार यांनी श्रीमती सिद्दिकी यांना फोन केला त्यावेळी श्रीमती सिद्दिकी यांनी त्यांच्या मुलाला डॉ. सिद्दिकी याला सांगतील्या त्याप्रमाणे रक्कम देण्यास सांगून लाच मागणी केली आहे. त्या अनुषंगाने आज दि.19.08.2024 रोजी श्रीमती डॉक्टर एजाज सिद्दिकी यांनी लाचेची रक्कम आरोपी क्र. 4 यांचेकडे देण्यास सागितले. त्यानंतर तक्रारदार यांचे कडून आज दि. 19.08.2024 रोजी ERS कोचिंग क्लासेस येथे सिद्दिकी फरार मोहम्मद रियाजुद्दीन यांनी लाचेची रक्कम 50000 रुपये स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले.आरोपी क्रं 2, 3 व 4 यांना ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे बेगमपुरा छत्रपती संभाजीनगर शहर येथे गुन्हा दाखल झाला आहे.▶️ *सापळा अधिकारी* –
    शंकर म.मुटेकर,पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी ला.प्र.वि. जालना. मो.नं. 9767108455▶️ *सापळा पथक*-गजानन घायवत, गजानन खरात, शिवाजी जमधडे, गणेश चेकें, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, जावेद शेख, भालचंद्र बिनोरकर, विठ्ठल कापसे,

    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    App on play store,yt-edtvjalna
    –www.edtvjalna.com
    https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    acb Anti Corruption Bureau PHD डॉ. रफिक झकेरीया महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर पीएचडी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleबा…ई आम्ही लाडाच्या ;बहीण CM च्या;जिल्ह्यामध्ये CM च्या 3 लाख लाडक्या बहिणी
    Next Article …तर मी पाणीही पिणार नाही;कमी प्रतिसादाला ” त्या” युट्युब चे “राजकारण “कारणीभूत -दीपक रणनवरे
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    विशेष बातमी: वैद्यकीय महाविद्यालयाची वर्षपूर्ती; 65 MBBS डॉक्टरांची भरती; प्रत्येक सामान्य रुग्णालयाच्या प्रत्येक वार्डात मिळणार एमबीबीएस डॉक्टर 24 तास

    October 16, 2025

    जिथे मिळवला रोजगार तिथेच केली चोरी; युवा प्रशिक्षणार्थ्याची आर.डी.सीच्या कार्यालयात चोरी; भाजपा आमदार आणि आरडीसीसी संबंधित पत्रव्यवहाराचे फोटो?

    October 11, 2025

    बालिकेला शोधा एक लाख रुपये मिळवा! पोलिसांनी जाहीर केले बक्षीस

    September 30, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    July 30, 20255,051 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,100 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,234 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    July 24, 20251,211 Views
    Don't Miss
    Breaking News October 16, 2025

    विशेष बातमी: वैद्यकीय महाविद्यालयाची वर्षपूर्ती; 65 MBBS डॉक्टरांची भरती; प्रत्येक सामान्य रुग्णालयाच्या प्रत्येक वार्डात मिळणार एमबीबीएस डॉक्टर 24 तास

    जालना- जालना जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले…

    जिथे मिळवला रोजगार तिथेच केली चोरी; युवा प्रशिक्षणार्थ्याची आर.डी.सीच्या कार्यालयात चोरी; भाजपा आमदार आणि आरडीसीसी संबंधित पत्रव्यवहाराचे फोटो?

    बालिकेला शोधा एक लाख रुपये मिळवा! पोलिसांनी जाहीर केले बक्षीस

    रणरागिणी-2025, वयाच्या 22 व्या वर्षी तीन नोकऱ्या दारात-BDO ज्योती राठोड

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    विशेष बातमी: वैद्यकीय महाविद्यालयाची वर्षपूर्ती; 65 MBBS डॉक्टरांची भरती; प्रत्येक सामान्य रुग्णालयाच्या प्रत्येक वार्डात मिळणार एमबीबीएस डॉक्टर 24 तास

    जिथे मिळवला रोजगार तिथेच केली चोरी; युवा प्रशिक्षणार्थ्याची आर.डी.सीच्या कार्यालयात चोरी; भाजपा आमदार आणि आरडीसीसी संबंधित पत्रव्यवहाराचे फोटो?

    बालिकेला शोधा एक लाख रुपये मिळवा! पोलिसांनी जाहीर केले बक्षीस

    Most Popular

    महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जमा झाला 166 बॅग रक्त साठा

    May 1, 20210 Views

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    May 5, 20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    May 6, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.