जालना- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू झाली आणि जालना जिल्ह्यात तीन लाख महिला मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ठरण्यासाठी पात्र ठरल्या. त्यापैकी काही बहिणींना राखी पौर्णिमेची ओवाळणी म्हणून खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांची प्रत्येक दीड हजार रुपये प्रमाणे 3000 रुपये रक्कमही जमा झाली आहे. ही योजना आणि योजनेची लाभार्थी जगजाहीर व्हावेत म्हणून शुक्रवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात या बहिणींसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जालनाचे पालकमंत्री ना. अतुल सावे यांचीही उपस्थिती होती. पात्र ठरलेल्या लाभार्थींचा तसेच या योजनेत सक्रिय सहभाग नोंदवून उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा आणि पर्यवेक्षकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, प्रभारी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, या योजनेची अंमलबजावणी करणारे महिला व बालविकास अधिकारी नवनाथ वामन, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्रीमती कोमल कोरे -चाटे यांची उपस्थिती होती. आतापर्यंत नारीशक्ती दूत ऍपद्वारे तीन लाख 566 अर्ज प्राप्त झाले आहेत ,त्यापैकी दोन लाख 90 हजार 871 अर्ज प्राप्त ठरले आहेत तर उर्वरित सहा हजार 399 किरकोळ कारणांच्या कारणामुळे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यामध्ये बदनापूर 25 हजार 913, भोकरदन 45 हजार 436, जालना 65 हजार 47, अंबड 41 हजार 291, जाफराबाद 26हजार 489, घनसावंगी 34 हजार 130 परतुर, 26 हजार 691 आणि मंठा 23 हजार459 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
-www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172
