जालना- वाईट गोष्टींना संपविण्यासाठी सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे आणि हे उभे राहत असताना संघर्ष करण्याची वेळ आली तरी ती वृत्ती सोडू नका असे मत उपप्राचार्य डॉ. सोमीनाथ खाडे यांनी व्यक्त केला आहे. जालना शहर मनपा मधील कर्मचारी दीपक मांडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. याच कार्यक्रमात स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय वसंतराव मांडे प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना “हिंदू समाजभूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक श्रीकांत पांगरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जालना शहर महानगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. सेवानिवृत्त कर्मचारी दीपक मांडे यांनी यापुढे आता आपण न्यायालयामध्ये वकिली करणार असून सामान्य माणसांच्या अडचणीला वाचक फोडणार असल्याचे सांगितले.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172