जालना- द्या 20  हजार! रुपये तहसीलदार मॅडम आणि पेशकर यांना द्यावे लागतील. असं म्हणत फेर घेण्याच्या निमित्ताने पैसे मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वीस हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

अंबड तहसील मधून सुमारे दोन महिन्यांपूर्वी शिवदास प्रेमसिंग पवार हे 46 वर्षाचे तलाठी जालना तहसीलदार बदलून आले. सध्या जालना तालुक्यातील मौजे इंदेवाडी (वर्ग 3)या सज्जावर ते कार्यरत आहेत. या प्रकरणातील तक्रारदाराने इंदेवाडी शिवारात जमीन घेतली आहे आणि त्याची ईसार पावती देखील झालेली आहे. परंतु पुढील व्यवहार पूर्ण करण्यासाठी फेर दुरुस्ती करणे आवश्यक आहे. हा फेर दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदाराने तलाठ्याकडे रीतसर अर्ज केले आणि भेटही घेतली. या भेटीदरम्यान तलाठ्याने हा फेर दुरुस्त करण्यासाठी तहसीलदारांचा कलम 155 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार आदेश काढणे गरजेचे असल्याचे सांगितले.  हा आदेश काढण्यासाठी जालनाच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार आणि पेशकार श्री. शिंदे यांना वीस हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. तक्रारदाराची तलाठ्याला पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने काल दिनांक 18 रोजी लाच लचुपात प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि तक्रार नोंदविली .या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आज दिनांक 19 रोजी तलाठी शिवदास प्रेमसिंग पवार याचे सोरटी नगर, अंबड चौफुली इथे असलेल्या खाजगी कार्यालयात सापळा लावण्यात  आला . या सापळ्यामध्ये तलाठी शिवदास पवार याला वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version