जालना- जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी जालना जिल्हा व विकास नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीमध्ये झालेल्या ध्येय धोरणांची आणि शासकीय कामकाजा बद्दलची माहिती दिल. पालकमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर पहिली भेट 26 जानेवारीला ध्वजारोहणासाठी झाली, आणि आज त्यांची ही दुसरी भेट होती. त्यामुळे जालनेकरांना अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून अपेक्षित होती.  दोन तास प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांनी शेवटी नामदार पंकजा मुंडे यांना घेरलेच! पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली दरम्यान. राजकीय आणि शासकीय प्रश्नोत्तरापेक्षा Edtv jalna news ने  विचारलेल्या आणि वेगळ्या असलेल्या प्रश्नाला देखील त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली आणि पत्रकार परिषदेमध्ये एकच हशा पिकला. त्यांच्या या उत्तरामध्ये त्यांचं बालपण, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी आणि भविष्यामध्ये काय असावं याचं गुपित उलगडलं आहे. पहा नामदार पंकजा मुंडे यांच्या शब्दातून.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version