जालना – छत्रपती संभाजी नगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025 या उद्या दिनांक 14 पासून जालन्यात सुरू होत आहेत या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे तर अध्यक्ष म्हणून पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री तथा जालनाच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महसूल ग्रामविकास व पंचायत राजचे राज्यमंत्री योगेश कदम यांचीही उपस्थिती राहणार आहे सकाळी नऊ वाजता पोलीस कवायत मैदानावर या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे.
दरम्यान या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थितीमध्ये जालना लोकसभा मतदारसंघातील सर्वच आमदार उपस्थित राहणार आहेत. तसेच या स्पर्धा विभागीय असल्यामुळे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर- घुगे, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, धाराशिव चे जिल्हाधिकारी सचिन ओंबाशे, हिंगोली चे जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवार दिनांक 16 रोजी सायंकाळी चार वाजता छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते पार पाडणार आहे या स्पर्धांना महसूल कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांनी उपस्थित रहावे असे प्रशासन आणि महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी *EDtv News अवश्य Subscribe करा* आणि बातमीबद्दल आपली *(Like Comment & Share)* प्रतिक्रिया द्या.बातमी वाचण्यासाठी www.edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या-9422219172