जालना- जन्मजात परिस्थिती कशीही असो आपल्या मनगटातील जोर आणि डोक्यातील मेंदूचा उपयोग केला तर तिच्यावर निश्चित मात करता येते हेच दाखवून दिलं आहे स्वाती सोमनाथ निकाळजे हिने.
घरात अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या स्वातीला लहानपणी भंगार वेचून आणि लग्नकार्यात जाऊन भिक मागून उदरनिर्वाह करावा लागला . तरुणपणात शिक्षण घेत असताना प्रेम विवाह झाला तो यशस्वी झाल्यानंतर काही दिवस घरच्या लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. त्याही परिस्थितीवर मात करत संसाराचा गाडा रेटत असताना सासरची परिस्थिती अत्यंत बिकट असताना सासूच निधन झालं. सासूने सांगितले की किमान अंत्यविधी तरी चांगला कर! सासूच्या या एका इच्छेखातर स्वाती पुन्हा नव्या जोमाने कामाला लागली साहजिकच वयाने मोठ्या झालेल्या आणि विवाह झाल्यामुळे भीक मागणे बंद करून आता तिला इतरांच्या घरी धुणे भांडे करण्याचे काम मिळाले. परिस्थिती नसतानाही सासूची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने कर्ज काढून चांगल्या पद्धतीने अंत्यविधी केला आणि आता हे कर्ज फेडण्यासाठी ती कधीकाळी लोकांचे टोमणे, लोकांच्या तुच्छ नजरेला तोंड देणाऱ्या, दुसऱ्यांच्या घरी धुनी- भांडे करत असताना मालकिणीच्या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. त्यामुळे तिने निर्णय घेतला तो स्वतःचा व्यवसाय करण्याचा आणि आज स्वाती चालती फिरती “रसवंतीवाली” झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172