जालना- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि हुतात्मा जनार्दन मामा नागापुरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 25 फेब्रुवारी,2025 रोजी जालना येथील हुतात्मा जनार्दन मामा नागापुरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यासाठी जवळपास 175 पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध होणार आहेत. या दोन्ही मेळाव्याचा नोकरीस इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर केले आहे.
रोजगार कार्यालयाकडील नोंदणीकृत सुशिक्षित महिला व पुरुष उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा तसेच मुख्यंमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करणार आहे. या मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून 175 रिक्तपदे दहावी, बारावी, कोणतीही पदवीधर, आयटीआय ट्रेडधारक (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, मशिनिष्ट, नर्सिग, सेल्स प्रतिनिधी इत्यादी) 18 ते 45 वयोगटातील पात्रताधारक उमेदवारांसाठी पदे उपलब्ध झालेली आहेत. आणखी काही पदे उपलब्ध होणार आहेत. तसेच या मेळाव्यात स्वयंरोजगाराबाबत अर्थसहाय्य करणाऱ्या विविध शासकीय महामंडळाचे स्टॉल लावण्यात येणार असुन विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच बरोबर स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना अंतर्गत विनामुल्य असलेले विविध रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाची माहिती देऊन नोंदणी करण्यात येणार आहे.
या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त नोकरी इच्छूक महिला व पुरुष उमेदवारांनी लाभ घ्यावा. तसेच उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा ,फोटो आणि आधारकार्ड ,सेवायोजन नोंदणी कार्ड आदि कंपनींला देण्यासाठी सोबत ठेवावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा यापुर्वी महास्वयंम वेबपोर्टलवर नोदणी केली असल्यास वरील रिक्तपदे व पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणाऱ्या पदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करुन लॉगीन करावे आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन आगामी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या सदराखालील जालना जिल्हा निवडून पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामधील तपशिल पहावा. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02482-299033 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
www.edtvjalna.com, Dilip Pohnerkar- 9422219172