जालना -वडीगोद्री येथील “ज्ञानगंगा” इंग्लिश स्कूल ही जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून सुरू करण्यात आलेली आहे. त्यासोबत इथे असलेले अन्य दोन गोदामे देखील या शाळेने स्वतःकडे वापरासाठी ठेवले आहेत .असा आरोप संत सावता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सचिन जाधव यांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाकडे दिलेल्या पत्रात केला आहे. त्यासोबत हे अतिक्रमण हटवावे अशी मागणी देखील केली आहे.
दरम्यान पंधरा दिवसांपूर्वीच ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सोमनाथ आप्पासाहेब काळे यांनी वडीगोद्री येथील संत सावता इंग्लिश स्कूलच्या धनगर समाजासाठी असलेल्या आरक्षित अनाधिकृत निवासी शाळेची चौकशी करावी. अशी मागणी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन समाज कल्याण विभागाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक 22 रोजी या विभागाचे पथक येऊन तपासणी करून गेले आहे. आता लक्ष आहे ते काय अहवाल येतो याकडे. परंतु याच दरम्यान सचिन जाधव यांनी देखील ज्ञानगंगा स्कूलच्या अतिक्रमणाचा मुद्दा उचलून धरला आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी जायकवाडी पाटबंधारे विभागाची इथे वसाहत होती आणि या वसाहतीच्या निमित्ताने इथे गोदाम आणि निवासस्थाने देखील बांधलेली आहेत. याच गोदामाचा ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलचे संचालक वापर करत असल्याचा आरोप तसेच ही शाळा देखील जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या जागेवरच सुरू असल्याचाही आरोप सचिन जाधव यांनी केला आहे आणि हे अतिक्रमण त्वरित हटवावे अशी मागणी देखील केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.