जालना- फेरफार साठी कोणतीही शासकीय फी लागत नसताना 3000 रुपयांची लाच मागणारा आणि तडजोडीअंती अडीच हजार रुपयावर तयार झालेल्या ग्राम महसूल सहाय्यकावर आणि त्याच्या एका खाजगी सहकार्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारून खाजगी व्यक्तीला तर पकडले परंतु ग्राम महसूल सहाय्यक फरार होण्यात यशस्वी झाला.

या प्रकरणातील तक्रारदाराच्या आईने पारध येथे जमीन खरेदी केले आहे. खरेदीनंतर फेरफार आवश्यक असतो त्या अनुषंगाने तक्रारदाराने ग्राम महसूल अधिकारी पारध येथील अभयकुमार मधुकरराव कुलकर्णी,वय 48 यांच्याकडे रीतसर अर्ज केला. परंतु काम होत नसल्यामुळे त्याने कुलकर्णी यांचा खाजगी सहकारी कृष्णा गणेश दळवी वय 36 वर्षे राहणार येवता, तालुका जाफराबाद याच्याशी संपर्क केला असता दळवी यांनी  अभय कुमार कुलकर्णी यांच्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली .परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने लगेचच  आज दिनांक 24 रोजी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला आणि तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा आरोपीच्या कार्यालयातच केली. त्यावेळी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले .दरम्यानच्या काळात काहीतरी रक्कम कमी करा म्हणून तक्रारदार, साक्षीदारासह अभय कुमार कुलकर्णी यांच्याकडे गेले असता कुलकर्णी यांनी अडीच हजार रुपयावर तडजोड केली. सदरील रक्कम कृष्णा दळवी यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने कृष्णा दळवी यांच्याकडे रक्कम देताच लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून रोख रकमेसह कृष्णा दळवी यांना पकडले आहे. त्यांची अंग झडती घेतली असता 28 हजार 290 रुपये सापडले आहेत. परंतु हा पैसा कुठून आला? याचा हिशोब दळवी यांना देता आला नाही .त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण 3हजार 790 जप्त करून कृष्णा दळवी याला ताब्यात घेतले आहे. तर अभय कुमारमधुकर कुलकर्णी हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे .अधिकारी त्याचा शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version