जालना- मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी जगन वाघमोडे हे संघटनेच्या अडचणी संदर्भात दोन दिवसांपूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या जालनात गेले होते. त्यावेळी काही शाब्दिक चकमक झाली आणि चकमकी मधून जगन वाघमोडे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगला गायकवाड धुपे यांच्या तोंडाला काळे फासण्याची भाषा केल्याचे तक्रार श्रीमती तुपे यांनी कदिम जालना पोलीस ठाण्यात केली आणि त्यावरून जगन वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज मराठवाडा शिक्षक संघ चांगलाच आक्रमक झाला आहे आणि आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालनाचे वाभाडेच काढले आहेत. कार्यालयीन वेळेनंतर रात्री आठ वाजता शिक्षण विभाग उघडा कसा? वाघमोडे यांनी केलेल्या गैरवर्तनासंदर्भात शिक्षण विभागाने सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज जारी करावे. शिक्षण विभागात पैसे घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नाही? एवढेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सहलींना परवानगी देण्यासाठी देखील शिक्षण विभागाने पैसे मागितल्याचा गंभीर आरोप मराठवाडा शिक्षक संघाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. याहीपेक्षा मोठा आरोप म्हणजे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे आणि या मागण्यांसाठी मंगळवार दिनांक चार रोजी छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयासमोर या संघाचे पदाधिकारी निदर्शने करण्यात करणार असल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता माध्यमिक शिक्षण विभागाचा “रात्री स खेळ चाले “हा कार्यक्रम दिवसा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version