जालना- गौण खनिज संपत्तीची चोरी करणाऱ्या माफीयांवर गेल्या दोन महिन्यांपासून महसूल आणि पोलीस प्रशासनाने चांगलीच कारवाई केली आहे . कांही माफीयांना तडीपार तर काहींना  स्थानबद्ध केलं आहे .असे असतानाही या माफीयांची मुजोरी अजून संपलेली नाही. त्यामुळे रात्री दोन वाजेच्या सुमारास परतूरच्या तहसीलदार प्रतिभा पांडुरंग गोरे वय  वर्ष यांच्यावर मुरूम चोरट्यांनी हल्ला केला .त्यामुळे आता महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यांमध्ये एक महिन्यांमध्ये 18 केसेस करण्याचे “टार्गेट” महसूल विभागाने घेतले असल्याचे समजते.

जालना जिल्ह्यातील वाळू चोरी ही राज्यभरात चर्चेचा विषय झाल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आणि या माफियांवर कार्यवाही देखील झाली. दरम्यानच्या काळात अनेकांना आपले जीवही गमवावे लागले. त्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासन यांनी कंबर कसून माफियांवर कारवाई केली. हद्दपार केलं, आणि अजूनही कारवाई चालूच आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून परतूरच्या तहसीलदार प्रतिभा मोरे या रात्री दीड वाजेच्या सुमारास गौण खनिज संपत्तीची पाहणी करण्यासाठी परतूर परिसरात आपल्या खाजगी वाहनातून बाहेर पडल्या. आंबा ते परतुर रस्त्याच्या दरम्यान एका ठिकाणी त्यांना जेसीबीच्या माध्यमातून हायवा मध्ये मुरूम भरताना काही लोक दिसले. त्यावेळी या ठिकाणी त्या गेल्या असता  या खनिज संपत्तीची चोरी सुरू होती. त्यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तिथे बोलावले सहकारी येईपर्यंत हायवा तेथीलच काही लोकांनी पळवून नेला आणि जेसीबी पारडगाव रोडला पळून जाण्याचे तयारीत होते. त्याचवेळी थोड्या अंतरावर जेसीबी चे टायर फुटल्यामुळे ते थांबले आणि तहसीलदारांनी पाठलाग करून तो जेसीबी पकडला. तेवढ्यात तिथे सात आठ तरुण आले आणि त्यांनी तहसीलदारांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला .या प्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी परतुर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून इलियास कुरेशी ,अमजद कुरेशी, इरफान युनू शेख, जुनेद, आणि इतर सात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गंभीर प्रकरणासंदर्भात महसूल विभागाच्या अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार, निवासी जिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार  छाया पवार नायब तहसीलदार आणि सर्वच कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेऊन निवेदन देऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version