जालना -जालना शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज जालना शहर महानगरपालिकेवर निदर्शने केली. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारातच बोंबाबोंब करून त्यांनी पालिकेच्या नावानं शिमगाही केला .दरम्यान निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील भास्कर आंबेकर यांनी निवेदन न देता तुम्ही निवेदन देण्याच्या सुद्धा…. असे म्हणत यापूर्वी दिलेल्या निवेदनांची मनपाच्या प्रवेशद्वारातच होळी केली.

शहरात भर रस्त्यावर असलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, मागील महिन्यामध्ये एका बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याला फाडून खाण्याचा प्रयत्न केला. शहरांमध्ये नूतन वसाहत रेल्वे स्थानक मस्तगड ,गांधी चमन, अशा महत्त्वाच्या चौकामध्ये या कुत्र्यांचे टोळके आहेत. त्यापासून अनेकांच्या जीवाला धोका होत आहे. या कुत्र्यांप्रमाणेच मोकाट जनावरांमुळे देखील वाहनांचे अपघात वाढले आहेत. एवढेच नव्हे तर शहरात विविध भागांमध्ये तयार केलेल्या रस्त्यांमध्ये विजेचे खांब उभे आहेत .या खांबामुळे तर एकाला आपला जीवही गमवावा लागला आहे .असे असतानाही महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे .खरंतर रस्ता तयार करण्यापूर्वी रस्त्याच्या मधोमध असलेले काम बाजूला सरकवणे आवश्यक होते .परंतु आजही हे काम रस्त्याच्या मधोमध जशाला तसे उभे आहेत .केवळ गुत्तेदारांचे पोट भरण्यासाठी कागदोपत्री कामे दिल्या जातात असा आरोपही भास्कर आंबेकर यांनी केला आहे. शहरातील पाणीपुरवठ्याच्या जल कुंभांना सुरक्षा रक्षक नसल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच नूतन  वसाहतीच्या जलकुंभात एक माणूस दोन दिवस सडला आणि त्याचे पाणी परिसरातील नागरिकांना दिला गेले .नागरिकांच्या आरोग्याची महानगरपालिका खेळ करत आहे असा आरोप करून जालन्यातील स्वच्छतेवर भर द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version