जालना- जालना जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागात नेहमीच सावळा गोंधळ सुरू असतो. कोणी लाभाच्या पदाची निवडणूक लढवतो तर कोणी अतिरिक्त ठरले तरी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बदली करूनही हजर होत नाही. त्यातच आता एक नवीन मोठं प्रकरण उघडकीस आहे ते म्हणजे परतुर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतुर येथील शालार्थ समन्वयक सहशिक्षक चंद्रकांत पौळ यांनी शिक्षकांच्या पगारातून कपात केलेली आयकाराची रक्कम गटशिक्षणाधिकाऱ्याच्या खात्यावर वर्ग केली आणि ती एक एप्रिल 2024 ते 29 मार्च 2025 दरम्यान 14 वेळा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या खात्यात वर्ग केली. त्यामध्ये एक वेळा धनादेशाद्वारे तर 13 वेळा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ही रक्कम वर्ग केली आहे.
या संदर्भात एक कोटी 34 लाख 45 हजार 438 रुपयांचा अपहार केल्याची नोटीस गटशिक्षणाधिकारी परतुर यांनी चंद्रकांत पौळ यांना बजावली आहे. याहीपेक्षा मोठा कहर म्हणजे बजावलेल्या नोटीस मध्ये आकड्यांमध्ये ही रक्कम वेगळी आहे आणि अक्षरांमध्ये ही रक्कम वेगळी आहे. त्यामुळे नोटीस बजावताना गटशिक्षणाधिकाऱ्यांनाच या नोटीसच गांभीर्य नाही?का त्यांचेच गणिताचे वांदे आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.