Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सुमारे1कोटींचा गुटखा,40 लाखांचे वाहन जप्त

    आठ जणांच्या टोळीने केकेल्या नकोत्या “उद्योगा”ची उलाढाल 20 लाखांची!!

    पुत्र व्हावा ऐसा… तुकाराम मुंढे यांचे जालना झळकले बॅनर

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » “पोकरा”चे(pocra) चौकशी अधिकारीच”पोखरलेल्या” डोंगराचा आश्रयाला?; शितल चव्हाण यांच्यावर शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; तीन कोटींचा आरोप सिद्ध-भाग १
    Jalna District

    “पोकरा”चे(pocra) चौकशी अधिकारीच”पोखरलेल्या” डोंगराचा आश्रयाला?; शितल चव्हाण यांच्यावर शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; तीन कोटींचा आरोप सिद्ध-भाग १

    EdTvBy EdTv07/04/2025Updated:07/04/2025No Comments3 Mins Read5 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- जालना येथील तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती शितल चव्हाण यांनी सन 2023- 24 मध्ये पोकरा(pocra) म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत शंभर कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार शासनाकडे केली होती. या तक्रारीची गंभर गंभीर दखल घेऊन शासनाने या प्रकरणाची चौकशी केली आणि या चौकशीमध्ये प्रथमदर्शनी 70 प्रकल्पांमध्ये तीन कोटी दहा लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले. यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची वसुली करण्याचे आदेश तत्कालीन प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी कृषी विभागाला दिले होते. त्यामध्ये शितल चव्हाण एक कोटी 20 लाख 413 रुपये तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते चार लाख वीस हजार 241 रुपये, तालुका कृषी अधिकारी वेंकट ठक्के 3 लाख 71 हजार 587 रुपये असे एकूण एक कोटी 28 लाख 12हजार 241 रुपयांची वसुली करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. परंतु कुठे माशी शिंकली माहित नाही ही वसुली तर दूरच शितल चव्हाण यांना कृषी अधीक्षक पदी पदोन्नती देऊन त्यांची सोलापूर येथे बदली करण्यात आली.( शासनाचे सर्व आदेश पाहण्यासाठी व्हिडिओ पहा)

    दरम्यानच्या काळात शासनाने या प्रकरणाची चौकशी केली आणि या चौकशीमध्ये 70 प्रकरणात तीन कोटी दहा लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले. या भ्रष्टाचाराची व्याप्ती पहाता या प्रकरणातील तक्रारदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष सुरेश गवळी यांनी याचा पाठपुरावा सुरूच ठेवला. या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यामुळे शासनाने शितल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

    असा आहे घटनाक्रम,23 सप्टेंबर 2024 वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कृषी आयुक्तालय ज्ञानचंद्र गीते यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2024 ला कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दक्षता पथक कृषी आयुक्तालय पुणे यांना पत्र देऊन विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजी नगर यांचे स्तरावरून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून घेऊन शंभर टक्के तपासणी करण्याचे आदेश दिले.दिनांक 26 सप्टेंबर विभागीय कृषी आयुक्त पुणे रविंद्र बिनवडे यांनी दिनांक 26 सप्टेंबर 2024 ला विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजी नगर यांना पत्र देऊन शासनाने दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आणि संबंधितावर रक्कम वसुली करण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.दिनांक 10 ऑक्टोबर विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजी नगर डॉ. टी. एस. मोटे यांचे प्रकल्प संचालक पोकरा मुंबई यांना पत्र. जिल्हा अधिकारी कृषी अधीक्षक जालना यांनी चौकशी प्रलंबित असल्याचे कळवले आहे .शितल चव्हाण यांच्या उपविभागातील चारही तालुक्यात शेतीची कामे सुरू आहेत त्यामुळे हे चौकशीचे  काम इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देण्यात यावे.10 ऑक्टोबर 2024 पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे कक्ष अधिकारी नितीन शेळके यांचे पत्र.( गुन्हा दाखल करण्याचे रवींद्र बिनवडे यांनी आदेश दिल्यानंतर अवघ्या एका महिन्यात हे पत्र आले आहे) या पत्रामध्ये शितल चव्हाण उपविभागीय कृषी अधिकारी जालना तसेच रामेश्वर भुते, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी भोकरदन व्यंकट ठक्के तालुका कृषी अधिकारी बदनापूर यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रस्तावित केलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यात येत आहे. पुढे काय झालं वाचा उद्याच्या भागात 

    अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी *EDtv News अवश्य Subscribe करा* आणि बातमीबद्दल आपली *(Like Comment & Share)* प्रतिक्रिया द्या.बातमी वाचण्यासाठी www.edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या-9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    Ed News pocra अवजारे बँक उपविभागीय कृषी अधिकारी जालना कृषी आयुक्त पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा पोकरा अनुदान भ्रष्टाचार शेडनेट सुरेश गवळी
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleयाद राखा गाठ माझ्याशी आहे, एकालाही सोडणार नाही! आमदार खोतकर यांनी कोणाला दिला इशारा?
    Next Article आत्म्यात “राम” भरणारा श्रीराम जन्मोत्सव सोहळा
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    सुमारे1कोटींचा गुटखा,40 लाखांचे वाहन जप्त

    09/09/2026

    आठ जणांच्या टोळीने केकेल्या नकोत्या “उद्योगा”ची उलाढाल 20 लाखांची!!

    29/08/2026

    पुत्र व्हावा ऐसा… तुकाराम मुंढे यांचे जालना झळकले बॅनर

    19/08/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,121 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,140 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,221 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,154 Views
    Don't Miss
    Breaking News 09/09/2026

    सुमारे1कोटींचा गुटखा,40 लाखांचे वाहन जप्त

    जालना- जिल्ह्यात बाहेर राज्यातून येणारा गुटखा काही थांबण्याचे नाव घेत नाही, गेल्या काही महिन्यांपासून जालना…

    आठ जणांच्या टोळीने केकेल्या नकोत्या “उद्योगा”ची उलाढाल 20 लाखांची!!

    पुत्र व्हावा ऐसा… तुकाराम मुंढे यांचे जालना झळकले बॅनर

    एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सुमारे1कोटींचा गुटखा,40 लाखांचे वाहन जप्त

    आठ जणांच्या टोळीने केकेल्या नकोत्या “उद्योगा”ची उलाढाल 20 लाखांची!!

    पुत्र व्हावा ऐसा… तुकाराम मुंढे यांचे जालना झळकले बॅनर

    Most Popular

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views

    मध्यरात्री गोदामावर छापा ऑक्सिजनचे 49 सिलेंडर जप्त

    09/05/20210 Views

    लोधी मोहल्ला दगडफेक प्रकरण; 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    11/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.