छत्रपती संभाजीनगर – भारतातील एक अग्रगण्य स्टील उत्पादक कंपनी असलेल्या ‘कालीका स्टील्स’ला ‘सीएमआयए २०२५’ पुरस्कारांमध्ये ‘सस्टेनेबिलिटी व पर्यावरण जाणीवपूर्वक उत्पादन’ या श्रेणीत गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार २७ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
१५० हून अधिक अर्जदारांची सखोल तपासणी व मुलाखतीनंतर पाच तज्ज्ञांच्या स्वतंत्र परीक्षक समितीने कालीका स्टील्सची निवड केली. पुरस्कार स्विकारताना घनश्याम गोयल, अनुज बन्सल आणि यश गोयल उपस्थित होते.दोन दशकांहून अधिक उत्पादन उत्कृष्टतेचा वारसा असलेल्या कालीका स्टील्सने पर्यावरण संरक्षणासाठी ‘शून्य निःसारण’ धोरण अवलंबले आहे. त्यांच्या पर्यावरणीय व सामाजिक बांधिलकीच्या कार्याला मिळालेल्या या सन्मानामुळे औद्योगिक क्षेत्रात विशेष आनंद व्यक्त होत आहे.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172