जालना- भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरात अभुतपूर्व मिरवणूक मंगळवार दिनांक 29 रोजी काढण्यात आली होती. सायंकाळी सात वाजता सुरू झालेली ही मिरवणूक रात्री अकरा वाजता विसर्जित झाली. जुन्याजालन्यातील ब्राह्मण सभा कार्यालयासमोर एका छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करून या मिरवणुकीला सुरुवात झाली. मस्तगड, मामा चौक, बालाजी गल्ली, शोला चौक, बडी सडक मार्गे श्रीराम मंदिरामध्ये या मिरवणुकीचे विसर्जन झाले. तत्पूर्वी जुना जालनातील ब्राह्मण सभा मंगल कार्यालयासमोर या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, स्वागताध्यक्ष डॉ. चारुदत्त हवलदार, कार्याध्यक्ष दीपक त्रिवेदी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. स्वागताला उत्तर देतांना आ. अर्जुनराव खोतकर यांनी ब्राह्मण समाजाबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले सनातन धर्म टिकविण्यामध्ये ब्राह्मण ऋषीमुनी तसेच ब्राह्मण समाजाचे मोठे योगदान आहे. जालना शहरापासून ब्राह्मण समाजाने सुरू केलेली ही चळवळ राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे आणि या चळवळीची इतिहासात नोंद केल्या जाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान मिरवणुकीत मध्ये समाविष्ट केलेला परशुरामांच्या भव्य दिव्य पुतळ्याच्या उभारणीसाठी आपण सर्वतोपरी मदत करू अशा आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
यावेळी व्यासपीठावर वेदशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य, नवीन जालना श्रीराम मंदिराचे विश्वस्त पं. गौड, भाजपाचे नेते भास्करराव दानवे, उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष भास्करराव आंबेकर , आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी जुना जालना भागातील ब्राह्मण समाजाच्या वतीने आणि नवीन जालना भागातील विप्र फाउंडेशनच्या वतीने एकत्र मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण ठरले ते उज्जैन येथील ढोल पथक .तसेच मिरवणुकीमध्ये महिलांची पावली , वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या तालात म्हटलेले अभंग, भगवान परशुराम युवा दल यांनी काढलेल्या मिरवणुकी दरम्यान महाकाल आघोरी यांचा सजीव देखावा ,शहरातील सर्वच अंधाऱ्या रस्त्यांवर मिरवणुकीमध्ये छत्रांवर केलेली विद्युत रोषणाई देखील आकर्षक ठरली.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172