जालना- धुळे येथील विश्राम गृहात  पाच कोटींची रक्कम सापडली आहे .ही रक्कम अंदाज समितीचे अध्यक्ष तथा जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई न करण्याच्या बदल्यात त्यांनी स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून 15 कोटींची रक्कम जमा केली होती. त्यापैकीच ही पाच कोटींची रक्कम आहे. त्यामुळे  जालना जिल्हा बीड सारखा होत आहे. त्यामुळे या “आकाचा” धनंजय मुंडे करा! अशी मागणी जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

या मागणी सोबतच श्री. गोरंट्याल यांनी आमदार खोतकर यांच्यावर जमीन हडप केल्याचे गंभीर आरोपही केले आहेत.  त्या संदर्भात त्यांनी कोणाकोणाच्या जमिनी घेतल्या यांची नावे देखील सांगितले आहेत. आमदार खोतकर यांचा अल फतेह  ग्रुपशी संबंध असल्याचा आरोप ही माजी आमदार कैलास गोरंटल यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत केलेले गंभीर आरोप जशास तसे वरील व्हिडिओमध्ये.

दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version