जालना- शहरात सध्या ई बाईकचा सुळसुळाट झाला आहे. नामांकित इलेक्ट्रॉनिक दुचाकी एक लाखांच्या पुढेच मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बाजारामध्ये एक लाखात तीन- चार अशा प्रकारची वाहने देखील मिळायला लागली आहेत. साधारणतः 30000 मध्ये ही बाईक बाजारात उपलब्ध  आहे. ही वाहने एवढी स्वस्त कशी ?असा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. परंतु अनेक जण वर्ष- दोन वर्षात पैसे फीटून जातात या भावनेतून देखील ही वाहने खरेदी करतात .कदाचित ते खरेही असले तरी अवघ्या महिनाभरातच तुम्ही खरेदी केलेल्या या ई बाईकचा खुळखुळा होऊ नये म्हणून काय चौकशी कराल याविषयी जनजागृती करणारी Edtv News ची ही बातमी.

साधारणपणे एका बाईक ची किंमत तीस हजार जर धरली तर व्यावसायिक अशा प्रकारच्या 20 बाईक आपल्या दुकानांमध्ये ठेवतात .या बाईकची होलसेल मध्ये किंमत( व्यावसायिकाला कंपनीकडून मिळणारी किंमत) 25000 धरली तर वीस बाईक ची किंमत झाली पाच लाख रुपये, आणि शोरूम चा इतर खर्च पाच लाख रुपये असा एकूण सुमारे दहा लाखांमध्ये हा व्यवसाय सुरू केल्या केल्या जात असल्याची शक्यता आहे .आणि वर्षभरात पैसा कमविल्यानंतर हे दुकान पुढे चालू राहिलंच याची कोणतीही खात्री नाही. त्यामुळे वाहन खरेदी करताना त्या प्रतिष्ठांनाची पार्श्वभूमी ,वाहनांमध्ये वापरलेले साहित्य, त्याची गुणवत्ता, भविष्यात त्याचे सुटे भाग मिळतील का? या सर्व बाबींची खात्री करूनच वाहन खरेदी करा. असे आवाहन गेल्या अनेक वर्षांपासून ई बाईक विक्रीच्या क्षेत्रात असलेल्या रवींद्र गायकवाड यांनी केले आहे.

सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version