Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » 35 लाख पचवले, परंतु पाच लाख पचवताना झाले अपचन आणि अडकले लाचेच्या जाळ्यात; छ संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पकडले रंगेहात
    Breaking News

    35 लाख पचवले, परंतु पाच लाख पचवताना झाले अपचन आणि अडकले लाचेच्या जाळ्यात; छ संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पकडले रंगेहात

    EdTvBy EdTvMay 27, 2025No Comments4 Mins Read440 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    छत्रपती संभाजी नगर- एका कामासाठी लाच म्हणून घेतलेले 35 लाख रुपये पचविल्यानंतर पुन्हा त्याच गरजू व्यक्तीकडून पैसे उकळण्याची लालूच वाढली आणि यामधून पुन्हा पैशाची मागणी झाली.  18 लाखांमध्ये ठरलेला दुसरा सौदा पाच लाखांच्या लाचेमुळे उघडकीस आला आणि सगळच अपचन झालं. छत्रपती संभाजी नगरचे निवासी उपजिल्हाधिकारी   विनोद खिरोलकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यासोबत त्यांचा एका सहकाऱ्याला देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. एवढेच नव्हे तर उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयातून रोख पंच्याहत्तर हजार रुपयांची रोकडही जप्त केली आहे.

    ▶️ तक्रारदार =पुरुष वय 49 वर्ष , राहणार -छत्रपती संभाजीनगर▶️आरोपी =1)श्री दिपक त्रिभुवन वय 40 लोकसेवक – महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर ( वर्ग 3)
    2)श्री विनोद गोंडुराव खिरोळकर वय 51वर्षे,निवासी उप जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर (वर्ग 1)
    ▶️तक्रारीचे स्वरूप =तक्रारदार यांनी व त्यांच्या पार्टनर यांनी मौजे तिसगाव, छ. संभाजीनगर येथील 6 एकर 16 गुंठे जमीन ही वर्ग 2 ची असल्याने सदर जमीन शासनाची परवानगी घेऊन सर्व नियमानुसार रजिस्टरीं खरेदी खत करून सन 2023 मध्ये विकत घेतली आहे.सदर जमीन ही वर्ग 2 ची असल्याने ती खरेदी करण्यासाठी शासनास लागणारे चलन जेनरेट करून देण्यासाठी अलोसे 1 व 2 यांनी 23 लाख रुपये मागणी करून या पूर्वी तक्रारदार यांचे कडून 23 लाख रुपये घेतलेले आहे.
    सदर जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1मध्ये करण्यासाठी नजराणा शासनास पुन्हा भरावयाचा असल्याने त्या साठी लागणारे चलन पुन्हा जनरेट करून देण्यासाठी आलोसे हे तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांचे कडे लाच म्हणून 18लाख रुपये ची मागणी करीत होते अशी तक्रार दि 23/05/2025 रोजी दिली▶️पडताळणी =दि 23/05/25 रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान अलोसे श्री त्रिभुवन यांनी, निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांनी 18 लाख रुपये सांगितले आहे.दि 26/05/25 रोजी लाच मागणी पडताळणी केली असता निवासी उप जिल्हाधिकारी यांचे केबिन मध्ये तक्रारदार, अलोसे विनोद खिरोळकर, अलोसे त्रिभुवन यांच्यात लाच रकमे बाबत बोलणे झाले व 5 लाख रुपये पहिले व फाईल कंम्लेट झाल्यावर फायनल पेमेंट 13 लाख रुपये रकम देण्याचे ठरले .

    ▶️सापळा कारवाई =दि 27/05/25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर नगर समोरील रोडवर आलोसे क्र 1.त्रिभुवन यांनी बोलावल्ल्या प्रमाणे सापळा कारवाईचे नियोजन केले असता तक्रारदार व तक्रारदार यांचे पार्टनर व पंच साक्षीदार यांचे सह थांबले असताना आलोसे हे सदर ठिकाणी आले व तक्रादार यांचे कडून 5 लाख
    रुपये लाच रकम स्वीकारताच आलोसे यास ताब्यात घेतले आहे
    अलोसे श्री विनोद खिरोळकर यांना स्वतंत्र टीमने लागलीच ताब्यात घेतले आहे▶️दि 27/5/25रोजी सापळा कारवाई मध्ये आलोसे त्रिभुवन यांनी 5 लाख रुपये लाच रक्कम स्वीकारली आहे▶️घरझडती =अलोसे यांची घरझडती प्रक्रिया चालू आहे

    ▶️ सिटीचा चौक स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे
    *इतर माहिती*
    आलो से क्रमांक 1 दीपक मधुकर त्रिभुवन, महसूल सहाय्यक, आर डी सी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर,
    अलोसे क्रमांक 2. श्री विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांना यांनी मौजे तिसगाव छत्रपती संभाजी नगर येथील गट नंबर 225/5 मध्ये 6 एकर 16 गुंठे ही वर्ग 2 ची जमीन शासनाच्या परवानगीने सर्व नियमानुसार रजिस्ट्री खरेदीखत करून सन 2023 मध्ये विकत घेतलेली आहे सदर जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यासाठी शासनास पुन्हा नियमानुसार चलन वाढवायचे असल्याने त्यासाठी लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी श्री खिरोळकर यांनी तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांच्याकडून 18 लाख रुपयांची लाच मागणी केली होती व अलोसे त्रिभुवन यांनी साहेबांशी बोलून तडजोड करून काही कमी होईल का याबाबत बोलणी करू व दिनांक 26/05/ 25 रोजी आलोसे क्रमांक एक व दोन यांनी तक्रारदार यांच्याकडे ठरल्याप्रमाणे लाच रक्कम 18 लाख मागणी करून त्यापैकी 5 लाख रुपये पहिल्यांदा व फाईल कंप्लेंट झाल्यानंतर बाकी राहिलेली लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून दिनांक 27 /5 /25 रोजी आलोसे श्री त्रिभुवन यांनी तक्रारदार यांचे कडून जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर समोर रोडवर पाच लाख रुपये लाच रक्कम स्वीकारताना पकडण्यात आली आहे म्हणून आलो असे क्रमांक एक व दोन यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 , 7अ ,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सिटी चौक पोलीस स्टेशन छत्रपती संभाजी नगर शहर या ठिकाणी सुरू आहे .➡️ आरोपींची अंगझडती आरोपी क्र .1 याचे कडे एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि तीन हजार रुपये रोख रक्कम.
    आरोपी क्र. 2 याचे कडे एक आयफोन 15 प्रो मॅक्स कंपनीचा मोबाईल. व त्यांचे केबिन मध्ये 75000/रुपये रोख रक्कम मिळून आली.

    https://youtube.com/@edtvjalna5167?si=Au7f6C5RR3ANSPeH
    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    www.edtvjalna.com
    दिलीप पोहनेरकर
    ९४२२२१९१७२

     

    acb लाच लुचपत प्रतिबंधक विभाग
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleजालना- नांदेड समृद्धी महामार्ग; शेतकरी- प्रशासनातील चर्चा फिसकटली?; आत्महत्येच्या निर्णयावर शेतकरी ठाम
    Next Article जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20253,970 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,174 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025520 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.