जालना- गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनामुळे श्रद्धास्थानांचे दिवाळे निघाले आहे.

देखभाल दुरुस्तीचा आणि कर्मचाऱ्यांचा खर्चही काढणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने ही श्रद्धा स्थानांची ठिकाणीच बंद ठेवल्यामुळे कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. मॉल, दारूची दुकाने उघडण्यापूर्वी शासनाने जर प्रार्थनास्थळे उघडली असती तर कोरोना कमी झाला असता असा दावा राजाबाग सवार दर्ग्याचे मुतवल्ली सय्यद जमील सय्यद जनिमियाँ यांनी केला आहे.


गेल्या आठ महिन्यांपासून मुस्लीम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले कुंडलिका नदीच्या काठावरील साडे सातशे वर्षांपूर्वीच्या या राजाबाग सवार मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणही दिले जाते. कोरोनाच्या काळात पहिलीतला विद्यार्थी आता थेट चौथीमध्ये जाईल. त्यामुळे दुसरी आणि तिसरी चा अभ्यास त्याला कळणार नाही आणि पर्यायाने तो शैक्षणिक दृष्ट्या कमजोर राहील असे मतही त्यांनी नोंदविले.


ज्या नावाने हा दर्गा आहे ते सय्यद अहमद हे त्याकाळी शेर म्हणजेच वाघावरून फिरत होते. त्यांच्या निधनानंतर या दर्ग्याला राजाबाग असे नाव पडले. ते आजही सर्वत्र प्रसिद्ध आहे .प्रार्थनास्थळा मधून नागरिकांना, भाविकांना आत्मिक समाधान मिळते आणि या समाधानातुन मानसिक तणाव कमी होतो. असे झाले तर मनावर येणारे दडपण आणि भीती कमी होईल . सहाजिकच कोरोना वर मात करण्यासाठी याचा फायदा होईल, असे मतही मुतवल्ली सय्यद जमील सय्यद जनिमियाँ यांनी मांडले.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version