जालना-राज्यामध्ये आरोग्य विभागातील विविध पदे रिक्त आहेत विशेषकरुन वर्ग क आणि ड साठी उद्या दिनांक 25 आणि दिनांक 26 रोजी या परीक्षा होत आहेत. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 15 हजार 783 परीक्षार्थी परीक्षा देऊ शकतील या पद्धतीने नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांनी दिली आहे.

उद्या दिनांक 25 रोजी वर्ग क साठी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे. क वर्गामध्ये अधिपरिचारिका, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आदी पदांचा समावेश आहे. या पदांची नोकरी मिळाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच किमान 40 हजार रुपये पगार या उमेदवारांच्या हाती पडणार आहे. जालना शहरातील 33 केंद्रांवर 7 हजार 565 उमेदवार ही परीक्षा देऊन आपले नशीब आजमावणार आहेत. रविवार दिनांक 26 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये वर्ग ड साठी परीक्षा होणार आहे. शहरातील 35 केंद्रांवर 8 हजार 218 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. ड वर्गामध्ये कक्ष सेवक, शिपाई, सफाई कर्मचारी, यांचा समावेश आहे. नोकरी मिळाल्यानंतर किमान 17 हजार रुपये पगार सुरू होणार आहे. परीक्षा होऊन उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर जालना जिल्ह्यात ड वर्गातील 43 पदे भरली जाण्याची शक्यता आहे. ही सर्व यंत्रणा नीसा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या यंत्रणेकडून राबविली जात आहे.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version