जालना- जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मंठा नगरपंचायत च्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये मंठेकरांनी काँग्रेसच्या आजी-माजी आमदार तथा पिता-पुत्रांना डावलून विद्यमान भाजपच्या आमदारालाही बाजूला सरकवले आणि शिवसेनेला साथ देत 17 पैकी 12 उमेदवार निवडून आणत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
पक्षीय बलाबल असे शिवसेना 12, राष्ट्रवादी काँग्रेस 1, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 2, आणि भारतीय जनता पक्ष दोन असे एकूण 17 उमेदवार निवडून आले आहे.
*सविस्तर निकाल*
प्रभाग क्रमांक 1 बोराडे अच्युत,शिवसेना513/652 2 पठाण बाज गुलाम, राष्ट्रवादी काँग्रेस 227/ 975.
3 शेख साजिद जलील काँग्रेस, 303/ 627
4 राठोड नंदा उत्तमराव शिवसेना, 695/ 980
5 बोराडे दीपक आसाराम शिवसेना, 391/ 684
6 दवणे यमुना शेषनारायण भाजपा, 300/ 671
7 वाघमारे छाया अरुण, शिवसेना 392 /906
8 खंदारे अशोक रावसाहेब काँग्रेस ,593/ 648
9 खाटीक दुरम रशीद शिवसेना, 554/ 892
11 बागवान खय्युम यासीन शिवसेना, 506 /790 ,
12 बोराडे वंदना वैजनाथ शिवसेना, 986/ 1028 13 बोराडे मिरा बालासाहेब,शिवसेना, 510/ 542
14 बोराडे सुषमा प्रदीप शिवसेना 558/ 594 .
15 बोराडे सरोज प्रल्हाद,शिवसेना 329/ 691
16 बोराडे शोभा प्रसाद भाजपा, 492/ 746 .
17 सूर्यवंशी रेणुकादास शिवसेना 443/ 817.
*ए. जे.बोराडे यांच वजन वाढलं* मंठा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे सक्रिय आणि एकनिष्ठ जिल्हाप्रमुख म्हणून ए. जे. बोराडे यांचे नाव आहे. आत्तापर्यंत विधानपरिषद सदस्य माजी आमदार धोंडीराम राठोड, त्यानंतर त्यांचे चिरंजीव विद्यमान विधानपरिषद सदस्य आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया ,हे तिघेही काँग्रेसचे आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांचा हा मतदारसंघ आहे. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी मंठा मध्ये कार्यरत आहे. अशा दिग्गज आजी-माजी आमदारांचा हा मतदार संघ असतानादेखील मंठा नगरपंचायत वर शिवसेनेचे निर्विवाद बहुमताने वर्चस्व स्थापन करणाऱ्या ए. जे. बोराडे यांचे वजन जनतेच्या दरबारात वाढल्याची ही लक्षणे आहेत.
निवडणुक प्रचारादरम्यान मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेले भाषण(संग्रहित)
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna