जालना-शेजारी सुरू असलेल्या मारहाणीत एका वृद्धाला वीट लागली आणि या अपघातामध्ये उपचारानंतर हा वृद्ध मरण पावला .त्यामुळे आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जालना तालुक्यातील लोंढेवाडी येथे असलेल्या जाधव कुटुंबीयांनी शनिवार दिनांक 14 रोजी तालुका पोलीस ठाणे- पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पुन्हा तालुका पोलीस ठाणे असा सुमारे दीड तास शववहिनीसह प्रवास केला.
विशेष म्हणजे जालना तालुका पोलीस ठाण्यात फक्त दोन महिला पोलिस कर्मचारीच उपस्थित होते. जालना तालुक्यातील लोंढेवाडी येथे राजू भिमराव पवार आणि त्यांच्या भावांमध्ये मध्ये मंगळवार दिनांक 10 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दगड- विटांनी हाणामारी झाली. या हाणामारी मध्ये शेजारीच असलेल्या ज्ञानदेव सखाराम जाधव या वृद्ध इसमाला एक वीट लागली आणि त्या मध्ये ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी जखमी ची पत्नी आणि सून राजू पवार यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ केली.
त्यावेळी केवळ दोन महिला पोलीस कर्मचाऱ्या कर्मचारी इथे उपस्थित होते .पुरुष कर्मचारी किंवा इतर वरिष्ठ कोणीच उपस्थित नसल्यामुळे हतबल झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी पुन्हा ही शववाहिनी पोलीस अधीक्षक कार्यालयात नेली. सुट्टी असल्यामुळे तिथेही कोणी उपस्थित नव्हते. अशा हतबल परिस्थितीत त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या दिला आणि नंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली. फोनाफोनी झाल्यानंतर या नातेवाईकांची समजूत काढून त्यांना पुन्हा तालुका पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले .तोपर्यंत या ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर हे इथे हजर झाले होते. गाडीत बसूनच त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला आणि पुढील कामाला निघून गेले. ते ठाण्याच्या बाहेर पडतात उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी ठाण्यात येऊन हे सर्व प्रकरण हाताळले .दरम्यान मृताच्या नातेवाइकांनी पुरवणी जबाब दिल्यानंतर पहिल्या गुन्ह्यांमध्ये खुनाचे 302 चे कलम वाढवून घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे सोडले.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com