जालना-पेट्रोल पंपावर आलेल्या रोख रकमेचा मालक वारंवार हिशोब मागत होता. या हिशोबाची कटकट मिटविण्यासाठी पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकानेच जबरी चोरी झाल्याचा कट रचला. दीड महिन्यानंतर पोलिसांनी फिर्यादीला पोलिसी खाक्या दाखवताच आपणच कट रचला असल्याचे कबूल केले.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील मूर्ती रोडवर असलेल्या श्रीकृष्ण पेट्रोल पंपावर नईम दगडू सय्यद, वय 35 राहणार कुंभार पिंपळगाव हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे .त्याला पेट्रोल विक्रीतून आलेल्या रकमेचा मालक वारंवार हिशोब विचारत होते .त्यामुळे नोकराने दिनांक 11 मे रोजी कट रचला आणि रोख रक्कम पळवून नेल्याचा बनाव केला. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपावर ची रोख रक्कम कुंभार पिंपळगाव येथील बँकेमध्ये भरण्यासाठी नईम सय्यद हा निघाला होता .दरम्यान दुचाकीवरून आपण जात असताना पांढर्या रंगाची चार चाकी गाडी आली आणि आपल्या दुचाकी समोर आडवी लावली. त्यामधील चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने पिस्टलचा धाक दाखवून बँकेमध्ये भरण्यासाठी नेत असलेली रोकड 6 लाख 51 हजार 480 रुपये त्या व्यक्तीने पळवून नेले, त्याचा पाठलाग केला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला.
दरम्यान महिनाभर यामध्ये पोलिसांनी या परिसरातील मोबाईल टॉवरची सर्व लोकेशने तपासली परंतु त्यामध्ये काही तथ्य आढळून न आल्याने नईम हाच आरोपी असल्याचे लक्षात आल्याने आज हा तपास पूर्ण केला आहे. घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा तपास पूर्ण झाला आहे.
*****
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com