जालना-जीडीसीसी म्हणजेच ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन या आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणावर न्यायालयाने आता उद्या दि.16 रोजी सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी किरण खरात आणि दीप्ती खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर यापूर्वी पाच वेळा तारखा वाढून मिळाल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा ही तारीख वाढली आहे.

दरम्यान या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले रमेश उत्तेकर, सय्यद इरफान, व्यंकटेश भोई, अमोध मेहतर, या चार जणांच्या जामीन अर्जावर आज होणारी सुनावणी त्यांच्या वकिलानी न्यायालयाकडे वेळ मागितल्यामुळे उद्या ठेवण्यात आली आहे. यांच्या सुनावणीमुळेच खरात दांपत्याची सुनावणी न्यायालयाने उद्या ठेवलेली आहे.दरम्यान सरकार पक्षाच्या वतीने प्रभारी सरकारी अभियंता बाबासाहेब इंगळे तर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सय्यद इरफान, अमोल मेहतर, व्यंकटेश भोई, यांच्या वतीने ज्येष्ठविधीज्ञ एच.डी. झोल हे काम पहात आहेत.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version