जालना -जालना नगरपालिकेमध्ये कंत्राटदार असलेल्या मधुकर परशुराम पवार या 51 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घाणेवाडी जलाशयात निदर्शनास आला आहे . ही आत्महत्या आहे का कोणी खून केला असा संशय व्यक्त केला जात आहे ?त्यामुळे नगरपालिकेशी निगडित असलेल्या आणखी एका व्यक्तीची आत्महत्या का खून ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे .

दरम्यान सुमारे दोन महिन्यांपूर्वी नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा आता दुर्घटना घडल्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रामेश्वर परशुराम पवार राहणार समर्थ नगर, यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या माहितीवरून दिनांक 14 मार्च 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता मधुकर पवार हे घरातून कोणाला न सांगता त्यांच्या सुपरवायझरची स्कुटी क्रमांक एम एच 21 बी एन 67 58 यावरून घरातून निघून गेले होते. रात्री दहापर्यंत ते वापस आलेच नाहीत त्यामुळे नातेवाईक आणि परिसरात विचारपूस केल्यानंतर देखील ते कुठेच सापडले नाहीत दरम्यान त्यांचा मृतदेह आज दुपारी चार वाजेच्या सुमारास जालना शहरापासून जवळच असलेल्या घाणेवाडी जलाशयात सापडला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version