जालना- मोती तलावात मेलेल्या माशांना नगरपालिकेच्या वतीने बाहेर न काढता तसेच सडू दिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

शहरातील मोती तलावामध्ये पंधरा दिवसांपूर्वी अनेक मासे मरून पडले होते त्यांचा तवंग पाण्यावर आला होता. या माशांचा मृत्यू कशामुळे झाला? हे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पालिकेने देखील या माशांची विल्हेवाट लावली होती मात्र अजूनही तलावामध्ये मोठ्या प्रमाणात मेलेले मासे सडत आहेत, आणि याचा दुष्परिणाम तलावाच्या खालच्या बाजूला असलेल्या योगेश्वरी नगर ,तुळसी पार्क, आणि परिसरातील इतर वस्तीवर झाला आहे. त्यांच्या बोरला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे ,तर दिवसभर सडलेल्या माशांचा दुर्गंध परिसरात पसरत आहे. या दुर्वासामुळे नागरिकांना उलट्या होणे, जेवण न जाणे, यासारखे आजार वाढायला लागले आहेत. तर दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अंगाला खाज येणे असे देखील प्रकार होत आहेत. यासोबत सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे महिला व बालके दिवसभर घरी असल्यामुळे त्यांना नाकाला बांधूनच परिसरात वावर करावा लागत आहे. घराच्या बाहेर फिरणे ही बंद झाले आहे दिवसा दारं खिडक्या बंद करून बसावे लागत आहे. त्यासोबत जेवायला बसल्यानंतर येणाऱ्या दुर्गंधीमुळे जेवणही जात नाही, पर्यायाने घरामध्ये दिवसभर उदबत्ती लावून ठेवावी लागत आहे. तलावातील मेलेल्या माशांची विल्हेवाट लावावी जेणेकरून या परिसरात बोरला येणारे दुर्गंधीयुक्त पाणी कमी होईल आणि परिसरातील दुर्गंधी देखील बंद होईल अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version