जालना -खारघर येथे दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारा दरम्यान 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूला कारणीभूत असलेल्या लोकप्रतिनिधींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
आ.गोरंट्याल पुढे म्हणाले की, 14 सदस्यांचा झालेला मृत्यू हा मनाला वेदना देणारी दुर्घटना आहे. 20 लाख सदस्य राज्यभरातून या कार्यक्रमाला आले होते, आणि राज्य सरकारने हा सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी तब्बल 13 कोटी रुपये खर्च केल्या गेले .एवढा खर्च करूनही “श्री” सदस्यांना उन्हातच बसावे लागले आणि उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला. सरकारच्या या ढिसाळ नियोजनामुळे हे मृत्यू झाले आहेत, त्यामुळे आपले अपयश लपविण्यासाठी सरकार मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत देऊन आपली सुटका करून घेत आहे ,ही मदत वाढवून देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. याच सोबत महाराष्ट्रातीची प्रतिमा मलीन करणारी ही घटना असल्यामुळे भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन बोलवण्याचे राज्य सरकारला आदेश द्यावेत, अशी मागणी ही कैलास गोरंट्याल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या सूचनानुसार केली आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com