परभणी- कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार यांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील विद्यार्थी विकास विभाग मंडळावर नामांकन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले  कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी (दी. 26) मे रोजी नामांकन पत्र देण्यात आले. डॉ. संगीता आवचार यांच्या नामांकनाबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. वसंत भोसले आदिसह सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

हे नामांकन झाल्यामुळे विद्यार्थी विकासाच्या योजना राबवण्यात सहभागी होता येते, उच्च शिक्षणातील विद्यार्थी या हितसंबंधी घटकास लाभ देण्यासाठी हे कार्यरत असलेल्या मंडळात त्यांचा सहभाग झाला आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नव्या जोमाने प्रयत्न सुरू होतील.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version