जालना- कृषी उत्पन्न बाजार समिती जालनाच्या परिसरात असलेल्या नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राच्या गोदामाला आग लागून सुमारे 12 ते 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास या हरभरे खरेदी केंद्राच्या गोदामाला आग लागली. यामध्ये हरभरा भरण्यासाठी आवश्यक असलेली पोते( बारदाना) आणि हरभऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी असणारी मशिनरी जळून खाक झाली आहे. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीने ही आग विझवण्यात आली. त्यासाठी दोन बंब आणि अनिशमन दलाचे जवान झटत होते. सुमारे दहा ते पंधरा लाख रुपयांचे नुकसान या आगीमध्ये झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com