मंठा- शेगाव येथून संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दांपत्याच्या कारला मंठा- लोणार रस्त्यावर अपघात झाला आणि या अपघातामध्ये पत्नीचा जळून मृत्यू झाला आहे.
परतुर तालुक्यातील कारळा येथील रहिवासी असलेले अमोल गंगाधर सोळंके वय 35 आणि त्यांची पत्नी सविता अमोल सोळंके वय 32 हे काल सायंकाळी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. आज दिनांक 23 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास ते कारळ्याकडे येत असताना मंठा ते लोणार रस्त्यावर असलेल्या महावीर जिनिंग जवळ त्यांची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच 21 ए एक्स 77 55 ला अपघात झाला आणि या अपघातामध्ये सविता सोळंके या पूर्णता जळाल्या आहेत.
यांनी घेतली घटनास्थळी धाव मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उपरे, परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अंभोरे आणि त्यांचे सहकारी तसेच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आकाश राऊत, बनकर, घोडके सुभाष राठोड, राजू राठोड, नगरसेवक अच्युत बोराडे आणि मंठा अग्निशमन दलाचे जवान.
https://edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर, mob 9422219172