जालना- आषाढी एकादशी निमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण असताना एखाद्या हॉस्पिटल मधून जर टाळ मृदुंगाचा आवाज आला तर निश्चितच त्याकडे लक्ष वेधले जाते .असाच आवाज शहरातील निरामय हॉस्पिटल मधून येत होता.निमित्त होते आषाढी एकादशीनिमित्त “अवघा एक रंग झाला” या भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे.
निरामय हॉस्पिटल व संगीत साधक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत शिक्षक दिनेश संन्याशी यांनी त्यांच्या संचासह गायलेल्या भक्ती गीतांना उपस्थित आणि दाद दिली. या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष तथा ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.धनश्री सबनीस यांना देखील गायनाचा मोह यावेळी आवरला नाही.उपस्थित मान्यवरांचे हॉस्पिटलचे संचालक डॉ.पद्माकर सबनीस आणि डॉ.गोविंद पंडित,डॉ.नितु पंडित यांनी स्वागत केले.
यांनी भरला रंग आरती,टाळ बोले चिपळीला… पार्थ.येग येग विठाबाइ… पृथा.आली कुठूनशी कानी …ग्रुपयेई गा तो माय बापा… डॉ. धनश्री सबनीस
सत्कार जय जय राम कृष्ण हरी..दिनेश संन्याशी
रूप पाहता लोचनी…… माही अर्दड. सुंदर ते ध्यान…पांडुरंग कांती…..श्रावणी हिवरेकर. देव माझा विठू सावळा। दुर्वा संन्याशीअंजली गुंजकर (गवळण) राधा राधा करी….यमुना खंदारे.तबल्यावर संदीप गुंजकर आणि श्रीनाथ देशपांडे यांनी साथ दिली.
दिलीप पोहनेरकर,9422219172