जालना- सन 2015 पासून रखडलेली शासकीय कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आहे. 2019 मध्ये भरती सुरू झाली होती आणि उमेदवारांनी अर्जही सादर केले होते परंतु, मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ही सर्वच भरती प्रक्रिया रेंगाळली होती. जालना जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 42 संवर्गांपैकी 19 संवर्गांमध्ये भरती होणार आहे. एकूण 467 पदे जालना जिल्हा परिषदेअंतर्गत भरल्या जाणार आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती आज दिनांक चार च्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच दिनांक पाच मध्ये ऑनलाइन पद्धतीने पाहायला मिळणार आहे. तसेच या भरती प्रक्रियेची लिंक देखील ओपन होणार आहे .जालना जिल्हा परिषदेच्या http://www.zpjalna.com या वेबसाईटवर किंवा खालील दिलेल्या वेबसाईटवर उमेदवाराला नियम अटी आणि अर्ज करण्याची पद्धत पाहायला मिळणार आहे. या संदर्भात जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी आज सविस्तर माहिती दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कोमल कोरे यांचीही उपस्थिती होती.

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कृपया Edtv च्या फोन वर  फोन करू नये.वेबसाईट पहावी.

या पदांसाठी होणार आहे भरती. आरोग्य पर्यवेक्षक एक, आरोग्य सेवक पुरुष 40% 42 ,आरोग्य सेवक पुरुष 50% 109, आरोग्य सेवक महिला 182 ,औषधी निर्माण अधिकारी 12, कंत्राटी ग्रामसेवक 50 ,कनिष्ठ अभियंता स्थापत्य 23 ,कनिष्ठ लेखा अधिकारी दोन, कनिष्ठ सहाय्यक 12, कनिष्ठ सहाय्यक लेखा पाच, पशुधन पर्यवेक्षक चार ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक, लघुलेखक उच्च श्रेणी एक ,लघुलेखक निम्न श्रेणी एक, वरिष्ठ सहाय्यक लेखा चार, विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी दोन एक, विस्तार अधिकारी सांख्यिकी तीन, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सात, पर्यवेक्षिका सात, अशा एकूण 467 पदांची भरती होणार आहे.

* प्रत्येक पदासाठी महाराष्ट्रात एकाच दिवशी परीक्षा होणार आहे त्यामुळे एका पदासाठी उमेदवार दोन ठिकाणी परीक्षा देऊ शकणार नाही. एक किंवा अनेक पदांसाठी तो परीक्षा देऊ शकेल. प्रत्येकाला परीक्षा केंद्र निवडण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध असणार आहेत. म्हणजे जालना जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरलेला असेल तर तो उमेदवार महाराष्ट्रात कुठल्याही केंद्रावर परीक्षा देऊ शकतो.—–———-

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna. com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version