जालना – कोरोना काळामध्ये सिताफिने परिस्थिती हाताळणाऱ्या पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांची सुमारे तीन वर्षांपूर्वी बदली झाली आणि सोबत ते पोलिसांचेही “चैतन्य” घेऊन गेले. त्यानंतर पोलीस प्रशासनातील मानापमान कुरघोड्या बाहेर आल्या आणि प्रशासन लोकप्रतिनिधींच्या हातातील  बाहुले बनले. सकाळी एका नेत्याने सांगितले की पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करायची आणि संध्याकाळी दुसऱ्याने सांगितले की ती पुन्हा रद्द करायची , यासोबतच कधी वेळ मिळाला तर शेतात चालणारे जुगार अड्डे आणि झाडाझुडपांच्या आडून चालणाऱ्या हातभट्ट्यांच्या दारूवर छापे टाकायच एवढेच काय ते काम चालू होतं. या सर्व व्यापातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसन्मानाकडे त्यांच्या पदोन्नतीकडे दुर्लक्ष केला गेलो त्यामुळे कर्मचारी देखील हवालदिल झाले आणि लढायचं कोणाच्या जीवावर म्हणून त्यांनी देखील आपल्या तलवारी म्यांन केल्या. आणि जनतेची टोमणे सहन केली.

दोन महिन्यांपूर्वी बदलून आलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार घेतला आणि पोलीस प्रशासनामध्ये  हालचाली सुरू झाल्या आहेत. हा कौतुक करण्याचा विषय नाही परंतु पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही बाबी दिसायला लागल्या आहेत. त्यामध्ये स्थानिक गुन्हा शाखेला दिलेलं पाठबळ, आणि त्यामधून उकल होणारे गुन्हे, त्यासोबत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या ,हा देखील मनोधैर्य वाढवण्याचा आणि चांगले काम करण्यासाठी प्रवृत्त करण्याचाच एक भाग आहे. काल सात पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली. यांची संख्या कमी असली तरी आज ना उद्या आपल्यालाही पदोन्नती मिळेल ,या विश्वासावर इतर कर्मचारी देखील काम करतील आणि ज्यांना पदोन्नती मिळाली आहे त्यांची जबाबदारी वाढल्यामुळे ते देखील चांगल्या पद्धतीने आता कामाला लागतील आणि पुन्हा एकदा पोलीस प्रशासनात” चैतन्य” निर्माण होईल असे चित्र निर्माण होताना दिसत आहे.

काल सहाय्यक फौजदारावरून पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्येअँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे सहाय्यक फौजदार रवी जोशी, घनसावंगी पोलीस ठाण्याचे शहाजी पाचरणे, हसनाबाद पोलीस ठाण्याचे राजू वाघमारे, सदर बाजार पोलिस ठाण्याचे संजय राऊत, चंदनझिरा पोलीस ठाण्यातील प्रवीणचंद्र कांबळे, पोलीस मुख्यालयातील दुर्गादास कौशल्य, मौजपुरी पोलीस ठाण्यातील शेख रशीद गफूर आणि पोलीस मुख्यालयातील प्रदीप घोरपडे यांचा समावेश आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version