Jalna District

विद्यापीठ सुधारणा कायदा विधेयक महाराष्ट्र राज्य सरकारने मागे घ्यावे-  प्रा. जोगस

जालना-  महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्हा पालकमंत्री राजेशजी टोपे  यांच्या भाग्य नगर , येथील निवासस्थाना समोर भाजपा युवा मोर्चा व युवती मोर्चा  जालना जिल्हा वतीने पहाटे 3 वाजता कलर स्प्रे पेंटींग करून विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक  महाराष्ट्र राज्य सरकारने मागे घ्यावे याकरिता राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष प्रा सुजित जोगस, मराठवाडा युवती संयोजिका शरमिश्टा कुलकर्णी, जिल्हा चिटणीस सचिन गाडे,जालना तालुका उपाध्यक्ष करणभाई निकाळजे, शहर सरचिटणीस विनोद दळवी, गणेश देशमुख, पंकज निकाळजे, रशमिका जोशी, विकास निकाळजे, अश्लेशा कुलकर्णी,  शुभम निकाळजे आदी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.