Jalna District

मोहब्बत अकल का सौदा नही…’ ,जीव घेतेस तू ग सखे साजणे ! …बहारदार कवितांनी कोजागिरी रंगत …

जालना-शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मित्र मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त निमंत्रितांचे कविसंमेलन व गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी ( ता.१९ ) करण्यात आले होते.
कार्यक्रमात मोहब्बत अकल का सौदा नही’ , यासह ‘ जीव घेतेस तू ग सखे साजणे ‘ अशा गझलेने कार्यक्रमात अधिक रंगत वाढत गेली…

 

शहरातील जुना जालना संजयनगर परिसरातील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे हे होते. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राख,प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, कवी कैलास भाले यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपात बोलताना जेष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे म्हणाले की, संवेदनशील अन भावस्पर्शी साहित्य हे मनाला उभारी देत असते. निर्मितीचा हेतू समोरच्याचा काळजाला हेलावून टाकेल,अशी कविता,गझल असते,तीच चिरकाल टिकत असते,असे सांगितले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भूमिका मांडत कवी कैलास भाले यांनी कोरोना परिस्थितीवर परखड भाष्य करीत ‘ कोरोना ‘ कवितेतून विषय मांडला. कार्यक्रमात शायर सुनील लोणकर यांनी ‘ मोहब्बत अकल का सौदा नही होता ‘ ही गझल सादर केली.कार्यक्रमात कवी कृष्षा आर्दड यांनी सादर केलेल्या ‘ जीव घेतेस तू ग सखे साजणे ‘ या कवितेला उपस्थितांनी उस्फूर्त दाद दिली.मनीष पाटील यांनी ‘ स्वर्गातील आत्म्यांनो ‘ कवितेतून शेतकरी आंदोलनावर टीकात्मक भाष्य केले.कवी डाॅ.दिगंबर दाते यांच्या ‘ दाढी ‘ कवितेने व्यवस्थेतील बदलत जाणारे संदर्भ आणि माणसाचा खोटेपणाचा बुरखा ‘ यावर वास्तवाचा वेध घेतला.कवी- पत्रकार डाॅ.सुहास सदाव्रते यांनी सादर केलेल्या ‘ मला माणसांची भीती वाटते रे ‘ या कवितेतून हरवलेल्या माणूसपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत कवितेला रसिकांनी दाद दिली.

कार्यक्रमात शिवाजी तेलंग यांनी ‘ खानदान’ , प्रा.पंढरीनाथ सारके यांनी ‘ मराठी मुलखात ‘ , प्रा.अशोक खेडकर यांनी ‘ माणसे हळुहळू सावर लागली ‘ ही गझल सादर केली.कार्यक्रमात डाॅ.प्रभाकर शेळके रत्नमाला मोहिते,वसंत सूर्यवंशी,लक्ष्मीकांत दाभाडकर, बंडू काळे, मिलिंद घोरपडे यांनी कविता सादर केल्या.
कार्यक्रमात गणेश देशपांडे, विनोद काळे यांनी ‘ चंद्र आहे साक्षीला ‘ हे भावगीत सादर केले. कवी सुहास पोतदार यांनी कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले.उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन संतोष कातुरे यांनी केले.कार्यक्रमास प्रभाग क्रमांक अकराचे नागरिक,साहित्य रसिकांची मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रम आयोजनासाठी गोपाल ठोंबरे, राजकुमार,महेंद्र वाघमारे,किशोर ढेकळे, अर्जुन बनसोडे, पवन गाडेकर, गणेश ढोबळे, रतन जाधव, उत्तम ढोबळे, मारोती शेरकर, सुरज ढोबळे, अर्जुन ढोरकुले, त्रषीकेश ढोबळे, गणेश माळवतकर यांनी प्रयत्न केले.

* साहित्यिकांना आवाहन*

इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये साहित्य प्रकाशित करण्याचे व्यासपीठ ईडी  (इलेक्ट्रॉनिक डिजिटल )टीव्ही ने उपलब्ध केलं आहे. साहित्यिकांनी दीपावली निमित्त असलेले विशेष लेख, कविता, चारोळी, व्यंगचित्र, हे  edtvjalna@gamil.com या इमेल  पाठवावे . सोबत स्वतःचे आणि संबंधित साहित्याशी निगडीत एक छायाचित्र पाठवावे.

-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.