शेतकऱ्यांनी पकडले चार संशयित चोर; दिला चांगला चोप
जालना-गेल्या अनेक दिवसांपासून जालना तालुक्यातील नंदापुर, बोरखेडी, धारकल्याण या भागामध्ये चोरांचा सुळसुळाट झाला होता. शेत वस्त्यांमधील कोंबड्या चोरुन नेण्यापासून ते उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थही त्रस्त झाले होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आणि ग्रामस्थ या चोरांच्या मागावर होते, रात्रपाळी करून चोरांचा तपास लावण्यासाठी प्रयत्न करीत होते.
दरम्यान काल रात्री धारकल्याण या गावात चोरी करण्याचा काही चोरांनी प्रयत्न केला मात्र तो फसला. परंतु चोर आल्याचा सुगावा गावकर्यांना लागला आणि गावकऱ्यांनी या चोरांचा पाठलाग केला. सिंदखेड राजा रस्त्यावर वरखेडी पाटीजवळ ग्रामस्थांनी आणि ढाबा चालकाने या चोराला अडविण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये चोरांची इंडिका उलटली. चारही संशयित चोर शेतामध्ये पळून गेले आणि सोयाबीन आणि कापसाच्या पिकामध्ये लपण्याचा प्रयत्न करू लागले .शेतकऱ्यांनी या चारपैकी तीन संशयितांना पकडले आणि चांगलाच चोप दिला.
त्यावेळी या संशयित चोरांकडून चोरीबद्दल ची सर्व माहिती घेऊन त्याचे चित्रीकरणही केले. दरम्यान काही वेळात पोलिसही तिथे पोहोचले आणि तीन संशयितांना घेऊन तालुका पोलिस ठाण्यातआणले. पहिल्या टप्प्यामध्ये रामा राजेभाऊ कदम,30, रुस्तुम भगवान खाडे 30, आणि राहुल राजेभाऊ कदम 25, या तिघांना पकडून पोलीस ठाण्यात आणले, तर उरलेला एक आरोपी सुरेश बालचंद सूटे 25, राहणार जळगाव सोमनाथ यालाही काही वेळाने पकडण्यात मध्ये पोलिसांना यश मिळाले. दरम्यान रामा आणि राहुल कदम हे दोघे सख्खे भाऊ आहेत .सिंदखेड राजा कडून डिझेल चोरुन गाडीमध्ये कॅन भरून आणल्याची कबुली या संशयित चोरांनी पोलिसांना दिली आहे. पहाटे सात वाजेच्या सुमारास तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. खाडे, पोलीस कॉन्स्टेबल यु. एम .जारवाल, अरुण मुंडे, वसंत धस, नितीन झोटे, कृष्णा भडांगे, यांनी घटनास्थळी जाऊन या संशयित चोरांना ताब्यात घेतले आहे.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172