चिरंजीव बाल रुग्णालयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; रुग्णाच्या नातेवाईकांनी एक लाख रुपये मागितल्याचा डॉक्टरांचा आरोप
जालना जालना- शहरातील चिरंजीव बाल रुग्णालयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णाकडून तसेच शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने कडून अशा दोन्ही मार्गाने रुग्णालयाने बिलाची रक्कम आकारली असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. आहे दरम्यान यासंदर्भात जिल्हा शल्य् चिकित्सक यांच्या समितीने चौकशी करू या प्रकरणात तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला आहे, परंतु रुग्णाचे नातेवाईक एक लाख रुपयांची मागणी करत होते आणि ते न दिल्यामुळेेे हा गुन्ह दाखल झाला आहेेे असा आरोप या रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर मधुुर करवा यांनी केलाआहे.
शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने मधून उपचार केले असतानाही चिरंजीव बाल रुग्णालयाच्या डॉ. उमेेश करवा यांनी रुग्णाचेेेेे नातेवाईक मिलिंद हिवाळे यांच्याक 19 हजार 500 रुपये रक्कम घेतली. यााप्रकरणी उमेश करवा यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये मिलिंद हिवाळे यांचा मुलगा या रुग्णालयात उपचार घेत होता आणि तो बरा होऊन त्याला सुट्टी ही देण्यात आली होती.
*मिलिंद हिवाळे यांनी मागितली रक्कम *
रुग्णाचे नातेवाईक मिलिंद हिवाळे यांनी सुरुवातीला 1 लाख रुपये आणि त्यानंतर 50 हजार रुपये अशा रकमेची मागणी केली, मात्र ती रक्कम न दिल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची माहिती या रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर मधुर करवा यांनी दिली आहे .त्याच सोबत हिवाळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा शल्य चिकित्सक आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही कार्यालयाच्या वतीने सखोल चौकशी करून यामध्ये रुग्णालयाचा दोष असल्याचा निर्वाळा देण्यात आला असल्याचेही डॉक्टर मधूर करवा यांनी सांगितले.
* आम आदमी ची पत्रकार परिषद*
दरम्यान डॉक्टर करवा यांच्यावर फक्त गुन्हा नोंद होऊन उपयोग नाही तर त्यांना अटक करून शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. येत्या सात दिवसात या रुग्णालयाचे डॉक्टर उमेश करवा यांना अटक झाली नाही तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा आम आदमी पक्षाच्याा वतीने या पक्षाचे कार्यकर्ते संजोग हिवाळे यांनी दिला आहे.
* ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा edtv jalna app.*