एक ते 15 फेब्रुवारी दरम्यान वाळू घाटांचे लिलाव
जालना- जिल्ह्यातील वाळूघाटांचा शासन निर्देशान्वये लिलावास योग्य 20 वाळूघाटात वाळूचे प्रमाणानुसार 30 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या कालावधीकरीता ई – निविदा व ई- ॲक्शनद्वारे लिलाव प्रक्रिया दि. 1 ते 15 फेब्रुवारी 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
वाळू लिलावाच्या अटी व शर्ती, वाळूची हातची किंमत व इतर सर्व माहिती खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या कार्यालयामध्ये आणि www.jalna.nic.in तसेच https://jalnaco.abcprocure.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल त्यांना ई – टेंडर व ई -ॲक्शन प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल.
लिलावाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जालना जिल्ह्यातील 20 वाळुघाटाचे लिलाव करण्यात येणार असुन त्या बाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
दि. 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.00 वाजेपासुन बिडर रजिस्ट्रेशन ऑनलाईन पध्दतीने संगणकीय नोंदणी सुरु होईल. दि. 10 फेब्रुवारी 2022 सायंकाळी 5 बिडर रजिस्ट्रेशन ऑनलाईन पध्दतीने संगणकीय नोंदणी बंद होईल.
दि.1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.00 वाजेपासुन ई निविदा ऑनलाईन संगणकीय पध्दतीने भरणे सुरु होईल. दि. 14 फेब्रुवारी 2022 सायंकाळी 5.00 वाजता ई निविदा ऑनलाईन पध्दतीने संगणकीय स्वीकारणे बंद होईल. EMD ची रक्कम दि. 14 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमा करणे अपेक्षित आहे. त्यानंतर जमा केलेल्या EMD च्या रक्कमेबाबत विलंब झाल्यास त्याची जबाबदारी निविदाधारकाची राहील.
दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी ई ॲक्शन ई लिलाव प्रक्रिया सकाळी 10.00 वाजता पासुन ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुरु राहील. शेवटच्या 15 मिनिटात कोणी बोली वाढविल्यास लिलावधारकास Auto Extension पध्दतीने 15 मिनिटांचा अवधी वाढून मिळेल.वाढीव 15 मिनिटांपैकी शेवटच्या 15 मिनिटात कोणी बोली लावल्यास Auto Extension system नुसार लिलावधारकास आणखी 15 मिनिटांचा अवधी मिळून ही प्रक्रिया अविरत सुरु राहील.
वाळुघाटाची नावे पुढीप्रमाणे आहेत जाफ्राबाद –जवखेडा ठेंग, जाफ्राबाद-देऊळगांव उगले (निमखेडा), जाफ्राबाद – सावंगी, जाफ्राबाद – मेरखेडा, भोकरदन – वालसा डावरगांव, भोकरदन –वालसा खालासा, भोकरदन – वालसा खालसा, भोकरदन – जवखेडा ठोंबरी, जालना – बढाण बु., जालना – गोलापांगरी , जालना – पाचनवडगांव, जालना-कौठा, जालना –घेटुळी, मंठा-किर्ला-टाकळखोपा, मंठा –किर्ला- वाघाळा, मंठा-कानडी-भूवन, मंठा-कानडी- उस्वद, अंबड – आलमगांव, परतुर – डोल्हारा बाबुलतारा, परतुर- गोळेगांव, अशी ठिकाणे आहेत.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna