पुढाऱ्यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला
जालना- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचा पुढार्यांवर असलेला रोष लक्षात घेता िल्हा प्रशासनाने पुढार्यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात गेल्या सहा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा म्हणून ठीक- ठिकाणी चक्री उपोषण, रास्ता रोको करण्यात येत आहे, तर अनेक तरुणांनी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आत्महत्याही केल्या आहेत. या घटनांमुळे पुढार्यांना अनेक ठिकाणी गाव बंदी ही करण्यात आली आहे. मराठा समाजाचा हा वाढता रोष लक्षात घेता पुढार्यांच्या बंगल्यांना पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे .जालना शहरात असलेल्या भाग्यनगर मधील माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे आणि त्यांच्याच बाजूला असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या बंगल्यासमोर हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.