जालना- जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेवारस आणि चोरीच्या मुद्देमालात जप्त केलेल्या दुचाकी म्हणजेच फटफटी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या आहेत. संबंधित वाहनांवर असलेल्या चासिस क्रमांकावरून तालुका पोलिसांनी वाहन मालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्यापही 28 वाहने अशी आहेत की ज्यांच्या मालकांनी ही वाहने नेली नाहीत .अशा मालकांसाठी तालुका पोलिसांनी जाहीर सूचना जारी केली आहे. त्या अनुषंगाने पुढील आठ दिवसांमध्ये जर ही वाहने संबंधित मालकाने नेली नाहीत तर त्यांचा लिलाव केला जाणार आहे. त्यामुळे आपले वाहन चोरीला गेले असेल, हरवले असेल तर संबंधित पोलीस ठाण्याची संपर्क साधून वाहनाची कागदपत्रे दाखवून ती घेऊन जावीत असे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे .या वाहनांचे नंबर आणि वाहनाच्या प्रकाराची यादी खालील प्रमाणे.
Dilip Pohnerkar, –9422219172