बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!

Advertisement

घ्या!लोकशाही वाचवण्यासाठी भाजपाचे गुजरात मध्ये आंदोलन – आ.अमृत ठाकूर

Loading

जालना- भारतामध्ये मत चोरी होत आहे हे आता जाहीर झाले आहे. त्यामुळेच “मत वाचवा देश वाचवा” हे अभियान काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. विरोधी पक्षाने असे आंदोलन करणे साहजिक आहे परंतु गुजरात मध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपानेच “लोकशाही बचाव आंदोलन” सुरू केले आहे याचाच अर्थ कुठेतरी लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे असा होतो. 

असे मत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा गुजरातचे आमदार अमृत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. मत वाचवा देश वाचवा या अभियानांतर्गत मतांमध्ये झालेली गडबड काँग्रेसचे कार्यकर्ते आता प्रत्येक घरोघरी जाऊन विचारणार आहेत .या आंदोलनाच्या नियोजनासाठी ते जालन्यात आले होते. विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेला खासदार डॉ.कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख ,काँग्रेसचे पदाधिकारी प्रभाकरमामा पवार, राजेंद्र राख, आदींची उपस्थिती होती. संपूर्ण पत्रकार परिषद पहा वरील व्हिडिओमध्ये.

– दिलीप पोहनेरकर,9422219172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *