जालना- हिंदू धर्माचाच एक अविभाज्य घटक असलेल्या मारवाडी माहेश्वरी समाजाने आज महेश नवमी उत्साहात साजरी केली. दिवाळी साजरी करावी तशा पद्धतीने माहेश्वरी समाजामध्ये महेश नवमी साजरी करतात .कारण आजचा हा दिवस माहेश्वरी समाजाच्या उत्पत्तीचा दिवस मानला जातो.
5153 वर्षांपूर्वी महादेवाने म्हणजेच महेशाने या समाजाची निर्मिती केली, म्हणजे पूर्वी हा समाज क्षत्रिय समाज म्हणून समजला जात होता या समाजाचे रूपांतर वैश्य समाजात केले म्हणजेच व्यापारी वर्गात केले .त्यामुळे या समाजातील बहुतांश समाज हा व्यापार करतो आणि सर्वात मोठा व्यापारी वर्ग या समाजाचा आहे .दिवाळी साजरी करावी त्याप्रमाणे हा सण साजरा केला जातो. आज जालना शहरात सकाळी आठ वाजेच्या सुमारास बडी सडक येथील श्रीराम मंदिरात हनुमान चालीसा पठणाने या महेश नवमीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली .फुल बाजार, दाना बाजार ,नर नारायण मंदिर मार्गे पुन्हा बडी सडक येथील श्रीराम मंदिरात महाआरतीने या मिरवणुकीचा समारोप झाला. बोलीभाषा जरी मारवाडी असली तरी हा समाज पूर्णपणे हिंदू आहे. त्यामुळे त्यांना हिंदू धर्मातीलच रूढी परंपरा रितीरिवाज आहेत कुठलाही वेगळा देव नाही. जालना शहरात या समाजाची हजार तर जिल्ह्यामध्ये सुमारे 3000 च्या जवळपास घरे आहेत. आज या समाजाने विविध जाती-धर्माच्या मान्यवरांना बोलावून भगवान महेश यांची आरती केली .आजच्या या मिरवणुकीचे नावीन्य म्हणजे अद्याप पर्यंत घराच्या बाहेर न पडलेल्या महिला आज मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. बँड वारकरी भजनी मंडळी अशा सर्वच वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक निघाली. राधाकृष्ण आणि शंकर पार्वती यांचे सजीव देखावे देखील यावेळी करण्यात आले होते. माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष विजय राठी ,सचिव उमेश बजाज, शिवरतन मुंदडा ,अनिल सोनी ,अतुल लढा ,पुसाराम मुंदडा, सुनील बियाणी ,श्यामसुंदर लखोटिया ,रामकिसन मुंदडा ,या समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील बहुतांश समाज या मिरवणुकीत सहभागी झाला होता
दिलीप पोहनेरकर, जालना-9422219172