जालना – गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे शनिवार, दि. 18 मे 2024 रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. हरियाणाचे राज्यपाल असताना त्यांनी राजभवन मध्ये असलेल्या काही ब्रिटिश कालीन परंपरा मोडीत काढल्या होत्या आणि होम हवनाच्या परंपरा सुरू केल्या होत्या .त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता, परंतु सप्टेंबर 2022 मध्ये नर्मदा जिल्ह्यात एका गावात नैसर्गिक शेती या विषयावर व्याख्यान देताना आचार्य देवव्रत यांनी हिंदू समाजाला एक नंबरचे ढोंगी संबोधले होते. हिंदू लोक गाईची पूजा करतात, तिलक लावतात, घंटी वाजवतात, जोपर्यंत गाय दूध देते तोपर्यंतच तिला सांभाळतात आणि नंतर रस्त्यावर सोडून देतात. त्यामुळे ते एक नंबरचे ढोंगी आहेत असे ते म्हणाले होते. त्यांच्या या जाहीर वक्तव्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. आज दिनांक 16 पासून जालन्यात सात दिवस चालणाऱ्या आचार्य श्री महाश्रवणजी यांच्या कार्यक्रमाला ते शनिवारी उपस्थित राहणार आहेत.
दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. 18 मे रोजी सकाळी 9.00 वाजता 21, फोर्टी ग्रिन्स, इटखेडा, छत्रपती संभाजीनगर येथून कारने गुरु गणेश तपोधाम, जालनाकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता गुरु गणेश तपोधाम, जालना येथे आगमन. सकाळी 10.00 ते 11.00 या कालावधीत ते गुरु गणेश तपोधाम येथे आचार्य महाश्रमणजी दिक्षा कल्याण महोत्सवामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती राहणार आहेत. सकाळी 11.00 वाजता गुरु गणेश तपोधाम, जालना येथुन कारने 21, फोर्टी ग्रिन्स इटखेडा, छत्रपती संभाजीनगरकडे ते प्रयाण करतील.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
-www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172