जालना- एटीएम फोडणारी टोळी छत्रपती संभाजी नगर शहरात रविवारीआल्याची कानकून पोलिसांना लागली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर मध्ये अलर्ट ही जारी केला होता, आणि चार चाकी वाहन क्रमांक एच आर 26 एफ सी 91 62 या वाहनाचा शोधही घेत होते. दरम्यान हे वाहन नागपूर वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये समृद्धी महामार्ग वरून आले आहे इथपर्यंत पोलिसांकडे माहिती होती. तसेच हे वाहन एके ठिकाणी थांबल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील छत्रपती संभाजी नगर पोलिसांकडे आहे. दरम्यान या चोरट्यांनी छत्रपती संभाजी नगरला लक्ष न करता पोलिसांना चकवा देत काल मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास नवीन जालना भागातील महावीर चौकात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम वर डल्ला मारला आणि सुमारे 24 लाखांची रोकड पळून नेले आहे.
जालना पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये क्रेएटा कंपनीची ही चार चाकी गाडी आहे, आणि महावीर चौकातून एटीएम समोर आली आणि पाणी वेस कडे गेली. दरम्यान या संदर्भात पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. यावेळी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दराडे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, यांचीही उपस्थिती होती. तत्पूर्वी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी घटनास्थळाची पाहणी करून वेगवेगळ्या टीम कामाला लावल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी चंदंनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक वसाहत परिसरातील याच बँकेचे एटीएमच चोरट्यांनी चोरून नेले होते. त्याचा तपास अद्याप बाकी असताना चोरट्यांनी पुन्हा हे नवीन आव्हान पोलिसांसमोर उभे केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172